Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी

Nana Patole On Malvan Incident: नाना पटोले यांनी मालवणच्या घटनेवरून राज्य सरकारसोबत मोदी सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. 'मोदी ज्याला हात लावतात तेच खराब होत आहे.', अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue:  सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी
Nana Patole On Malvan IncidentSaam Tv
Published On

Nana Patole On Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पीएम नरेंद्र मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात. या घटनेवरून राजकारण देखील चांगलेच तापले आहे. विरोधकांनी राज्य सरकारसोबतच केंद्र सरकारवर टीका केली आहे. आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या घटनेवरून राज्य सरकारसोबत मोदी सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. 'मोदी ज्याला हात लावतात तेच खराब होत आहे.', अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue:  सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी
Chhatrapati Shivaji Maharaj: महाराज, आम्हाला माफ करा ! सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा कोसळला

नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'ही लोकं छत्रपती शिवाजी महाराज यांचा सतत अपमान करत आले आहेत. हे सरकार कमिशन खोर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचं सरकार नाही. १ रुपयांची वस्तू १० रुपयांत विकत घेतली जाते. मूर्तिकार यांना अनुभव नसताना सुध्दा त्यांना मूर्तीचे काम दिलं. २३६ कोटी मूर्ती बनवायला आणि ५ कोटी रुपये सौंदर्य करायला खर्च केला आहे. राज्य सरकार म्हणते की आमचा दोष नाही केंद्र सरकारचा दोष आहे.'

Chhatrapati Shivaji Maharaj Statue:  सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी
Chourang Punishment : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची अब्रू लुटणाऱ्यांना दिली जाणारी 'चौरंग' शिक्षा काय होती?

तसंच, 'पीएम मोदी तर छत्रपतींचा अपमान करायला उठले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान भाजपा करत आहे. राज्य सरकारवर एफआयआर दाखल करण्यासाठी डीजीपींना पत्र देणार आहे. मोदी ज्याला हात लावतात तेच खराब होत आहे. अधिकारी किंवा कंत्राटदार यांचा‌ दोष नसून राज्य सरकारच दोषी आहे. सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे.', अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue:  सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी
Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, वर्षभरापूर्वी PM मोदींनी केलं होतं अनावरण

राज्यातील महिला आत्याचारावर देखील नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'राज्यात महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगारांवर लगाम नाही. बदलापूरमध्ये घटना झाली त्यामध्ये आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. पोलिस बघ्याच्या भूमिकेत आहे. गुंड लोकांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे.', असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त केला आहे.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue:  सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी
Vaibhav Naik: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, आमदार वैभव नाईक यांनी PWD कार्यालय फोडलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com