Chhatrapati Shivaji Maharaj: महाराज, आम्हाला माफ करा ! सिंधुदुर्गात महाराजांचा पुतळा कोसळला

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सिंधुदुर्गातील मालवण येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यातच कोसळल्याची घटना घडलीय.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue:
Chhatrapati Shivaji Maharaj Statue:
Published On

कोकणात मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला आहे. केवळ आठ महिन्यात पुतळा कोसळल्यानं राज्यभरात संताप व्यक्त होतोय. पंतप्रधानांच्या हस्ते नौदल दिनानिमित्त पुतळ्याचं गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अनावरण करण्यात आलं होतं. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय. पाहूया एक खास रिपोर्ट.

मालवण येथे 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. याच दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फूट उंच पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळी कोणाच्या मनातही आलं नसेल की केवळ आठ महिन्यातच हा पुतळा कोसळेल. मात्र दुर्देवानं राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा हा पुतळा कोसळला. या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुतळ्याच्या निकृष्ट कामावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

दरम्यान या घटनेनंतर ठाकरे गटानं मंत्री रवींद्र चव्हाण आणि इतर अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांनी मालवणमधील PWD कार्यालयाची तोडफोड केलीय. या पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होतं. या घटनेनं सरकारचे वाभाडे निघालेत, असा संताप नाईक यांनी व्यक्त केला आहे.

माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सर्वात आधी या पुतळा योग्यरित्या उभारला नसल्य़ाची तक्रार केली होती. तर या पुतळ्यावर संभाजीराजे छत्रपतींनीही आक्षेप घे पंतप्रधानांना पत्र लिहिलं होतं. पुतळा उभारताना कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं ते पाहूया.

महाराजांच्या पुतळ्याबाबत काय आक्षेप ?

राजकोट किल्ल्यावर 5 कोटी रुपये खर्चून उभारला पुतळा

43 फूट उंचीचा महाराजांचा पूर्णाकृती पुतळा

पुतळा शिल्पशास्त्रास अनुसरून नसल्याची तक्रार

पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटनासाठी घाईगडबडीत लोकार्पण

वाऱ्याची दिशा, पुतळ्याचा चौथरा याकडे दुर्लक्ष

शास्त्रोक्त पद्धतीनं काम झालं नसल्याचा आरोप

निकृष्ट दर्जाचं काम केल्याची तक्रार

पुतळा उभारण्याचं काम ठाण्यातील ठेकेदाराकडे होतं. मात्र योग्यरित्या काम झालं नसल्यामुळेच केवळ ८ महिन्यांत हा पुतळा कोसळला. महाराष्ट्राचं आराद्य दैवत असलेल्या शिवरायांचा पुतळा कोसळणं ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. महाराजांनी उभारलेल्या जलदुर्गांना तीनशे वर्षांनंतरही समुद्राच्या लाटा भेदू शकल्या नाहीत. मात्र त्याच जाणत्या राजाचा ४३ फुटांचा पुतळाही साधा ८ महिनेही टिकू शकला नाही. अशा ठेकेदारांसह भ्रष्ट बाबू आणि नेत्यांवर कारवाई व्हायलाच हवी, अखेर प्रश्न महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे, मात्र या उपटसुंभांवर कारवाई होईल तेव्हा होईल...मात्र यानिमित्तानं एवढंच म्हणावंसं वाटतंय़. महाराज आम्हाला माफ करा.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue:
Milind Deora: काँग्रेस पक्ष शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांना मानत नाही; मिलिंद देवरा यांचं टीकास्त्र

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com