Dahi Handi 2024: दहीहंडीच्या उत्साहात ११४ गोविंदा जखमी, चौघे गंभीर

Govinda Injured In Mumbai And Thane: दहीहंडी साजरी करत असताना अनेक ठिकाणी गोविंदा जखमी झाले. थरावर थर रचण्याच्या प्रयत्नांमध्ये मुंबईसह ठाण्यामध्ये ११४ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Dahi Handi 2024: दहीहंडीच्या उत्साहात ११४ गोविंदा जखमी, चौघे गंभीर
Dahi Handi Saam TV
Published On

मुंबईसह उपनगरामध्ये मोठ्या उत्साहत दहीहंडीचा सण (Dahihandi Festival 2024) साजरा करण्यात आला. 'बजरंग बली की जय...गोविंदा रे गोपाळा' म्हणत गोविंदा पथकांनी जल्लोष केला. रात्रीपर्यंत अनेक ठिकाणी दहीहंडी फोडण्यात आल्या. दहीहंडी साजरी करत असताना अनेक ठिकाणी गोविंदा जखमी झाले. थरावर थर रचण्याच्या प्रयत्नांमध्ये मुंबईसह ठाण्यामध्ये ११४ गोविंदा जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. यामधील ४ गोविंदा गंभीर जखमी आहेत. तर ७४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर इतर गोविंदांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जखमी गोविंदांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

Dahi Handi 2024: दहीहंडीच्या उत्साहात ११४ गोविंदा जखमी, चौघे गंभीर
Dahi Handi Viral Video: 'हर तरफ हे शोर'च्या गाण्यावर चिमुकल्यांचा उत्साह अनोखा; शाळेच्या आवारातच रंगला दंहिहंडीचा शो

मुंबईसह ठाण्यामध्ये मंगळवारी सकाळपासून दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. मोठ्या प्रमाणात गोविंदा पथकांनी यामध्ये सहभाग घेतला होता. अनेक राजकीय नेत्यांच्या दहीहंडीने यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. जय जवान गोविंदा पथकाने ९ थरांची सलामी दिली. १० थरांची सलामी देण्याचा या गोविंदा पथकाने प्रयत्न केला पण तोल गेल्याने गोविंदा खाली पडले. यावर्षी ठाण्याच्या खोपटचा राजा गोविंदा पथकाने ९ थरांची सलामी दिली. मंगळवारी दिवसभर अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे गोविंदाचा उत्साह आणखी वाढत गेला.

Dahi Handi 2024: दहीहंडीच्या उत्साहात ११४ गोविंदा जखमी, चौघे गंभीर
Ghatkopar Dahi Handi : गोविंदा रे गोपाळा! थरावर थर, ढोल ताशाचा गजर; घाटकोपरच्या दहीहंडीचा VIDEO पाहाच

गोविंदा पथकांनी जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न केला. पण या प्रयत्नामध्ये अनेक गोविंदा जखमी झाले. काही गोविंदाच्या मानेला, डोक्याला, हाताला, पायाला दुखापत झाली. काहींचा हात तर काहींचा पाय फॅक्चर झाला. या जखमी गोविंदांमध्ये चिमुकल्यांचा देखील समावेश आहे. १३ वर्षांची मुलीच्या मांडीचे हाड मोडले तिच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू आहे. राजावाडी रुग्णालयात ३ लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. दोन लहान मुलांचे हात फॅक्चर झाले असून त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Dahi Handi 2024: दहीहंडीच्या उत्साहात ११४ गोविंदा जखमी, चौघे गंभीर
Dahi Handi Safety Precautions : गोविंदा आला रे आला! दहीहंडी फोडताना 'या' वस्तू स्वत:जवळ ठेवायला विसरू नका

मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये दोन गोविंदावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. एका गोविंदाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. नायर रुग्णालय आणि ट्रॉमा रुग्णालयामध्ये प्रत्येकी एका गोविंदावर उपचार सुरू असून त्यांची देखील प्रकृती गंभीर आहे. ठाण्यामध्ये १४ गोविंदा जखमी झाले. यामधील काही जणांना गंभीर तर काही जणांना किरकोळ दुखापत झाली. कळवा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर नवी मुंबईमध्ये ७ गोविंदा जखमी झाले. यामधील दोघांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या गोविंदांवर वाशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dahi Handi 2024: दहीहंडीच्या उत्साहात ११४ गोविंदा जखमी, चौघे गंभीर
Dahi Handi 2024 : मुंबई, ठाण्यात घुमणार 'ढाक्कुमाकुम'चा सूर; दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज, मानाच्या हंड्यांकडे असणार विशेष लक्ष

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com