Dahi Handi 2024 : मुंबई, ठाण्यात घुमणार 'ढाक्कुमाकुम'चा सूर; दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज, मानाच्या हंड्यांकडे असणार विशेष लक्ष

dahi handi celebration : मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये मंगळवारी 'ढाक्कुमाकुम' सूर घुमणार आहे. शहरातील उंच दहीहंड्या दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज झाला आहे. शहरातील मानाच्या हंड्यांकडे लोकांकडे विशेष लक्ष असणार आहे.
मुंबई, ठाण्यात घुमणार 'ढाक्कुमाकुम' सूर; दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज, मानाच्या हंड्यांकडे असणार विशेष लक्ष
dahi handi celebration Saam tv
Published On

मुंबई : तरुणांचा आवडीचा सण म्हणजे दहीहंडी. तरुणाई दहीहंडी सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. मुंबई ठाण्यातील हीच दहीहंडी बघण्याची अनेकांना आस लागलेली असते. दहीहंडी फोडण्याचा 'याची देही याची डोळा' पाहण्याचा अनुभव अनेकांसाठी सुखद अनुभव असतो. देशभरात विविध ठिकाणी दहीहंडी सण साजरा केला जातो. मात्र, मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा जोश काही और असतो. यंदाही मुंबई आणि आसपासच्या शहरात सर्वात मोठी दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकाची धडपड पाहायला मिळणार आहे. मुंबईतील सर्वात उंच दहीहंडी कोणता गोविंदा पथक उंच मनोरा लावून फोडणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले असणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथक मानाच्या दहीहंडी फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे उद्या थरांची स्पर्धा, बाळ गोपाळांचा जल्लोष आणि बक्षिसांची लयलूट असा माहोल नागरिकांना अनुभवयाला मिळणार आहे.मुंबईसह आसपासच्या शहरातील दहीहंडी उत्साहात कलाकार आणि राजकीय नेते भेट देणार असल्याने गोविंदाचा उत्साह द्विगुणित होणार आहे. तर यंदा ठाण्यात आमदार प्रताप सरनाईक यांच्या 'संस्कृती प्रतिष्ठान'ने पहिले १० आणि ९ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला आकर्षक बक्षिस देणार असल्याची घोषणा केली आहे.

मुंबई, ठाण्यात घुमणार 'ढाक्कुमाकुम' सूर; दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज, मानाच्या हंड्यांकडे असणार विशेष लक्ष
Dahi Handi Safety Tips : दहीहंडी पाहायला जाताय? मग 'या' गोष्टींचं भान ठेवा अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

मुंबईत उद्या वरळीतल्या जांबोरी मैदानातील सचिन अहिर यांच्या संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी, दादरची छबिलदास लेन येथील दहीहंडी, वांद्र कॉलनी येथील दहीहंडी, मागाठाणे येथील दहीहंडी, संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी, टेंभी नाक्यावरील आनंद दिघेंची दहीहंडी याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मुंबई, ठाण्यात २५ ते ३० हजार गोविंदा पथक हजर लावण्याची शक्यता आहे. या मान्याच्या दहीहंडी उत्सवाला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. करिश्मा कपूर, विकी कौशल, गौतमी पाटील यांच्या एन्ट्रीकडे तरुणांचं विशेष लक्ष असणार आहे.

मुंबई, ठाण्यात घुमणार 'ढाक्कुमाकुम' सूर; दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा सज्ज, मानाच्या हंड्यांकडे असणार विशेष लक्ष
Dahi Handi Vima Yojana: हंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांना मिळणार लाखोंची मदत; अर्ज कसा कराल?

ठाण्यात दहीहंडी उत्सावाची सुरुवात

ठाण्यातील संकलप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दहहांडी उत्सवाची सुरुवात रात्री अभिनेते अंशुमन विचारे यांच्या हस्ते हंडी फोडून झाली. माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाचा दरम्यान उद्या अनेक पथके या ठिकाणी हंडी फोडण्यास येणार आहेत. आजच्या उत्सवात अभिनेते दिगंबर नाईक यांनी गाऱ्हाणे गाऊन उत्सवाची सुरुवात केली. तसेच त्यांनी उत्सवाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com