Maratha Reservation update  Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात सामील मराठा तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Maratha Reservation update : जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनात सामील मराठा तरुणाचा मृत्यू झालाय. तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय.

Vishal Gangurde

मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेल्या विजय घोगरे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

विजय घोगरे हे लातूरच्या टाकळगाव गावचे रहिवासी

आंदोलनात सहभागी आंदोलकांची रहाण्याची आणि जेवणाचे हाल

मराठा आंदोलनात मृत्यू झालेली दुसरी घटना

संदिप भोसले, साम टीव्ही

मुंबईतील आंदोलनात सहभागी झालेले आंदोलकांचे राहण्यापासून जेवणाचे प्रचंड हाल होत असल्याचे निर्दशर्नास येत आहे. सुविधांची वाणवा असताना आंदोलक तीव्रपणे आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत. याच आंदोलनात सहभागी झालेल्या लातुरातील मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विजय घोगरे असे मृत्यू पावलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. मृत तरुण लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील असल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे मनोज जरांगे आमरण उपोषण करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच, मुंबईकडे कूच करताना जुन्नर येथे एका मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. आज पुन्हा मुंबई येथे आंदोलनात सहभागी असलेल्या विजय घोगरे या मराठा कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या तरुणाला उपचारासाठी जे जे रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र डॉक्टरने या कार्यकर्त्याला मृत घोषित केले आहे. तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पैठण तालुक्यात चार दिवसांपासून मुसळधार

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसऱ्या मेळाव्याचा टीझर प्रदर्शित, ठाकरे बंधूंची युतीची शक्यता|VIDEO

Facebook : १ लाख व्ह्यूजमागे फेसबुक किती पैसे देतो? जाणून घ्या

Mumbai Tourism: मुंबईपासून काहीच अंतरावर आहे निसर्गाचा खजिना, 'या' ठिकाणी येताच थकवा विसराल

Mumbai News : देवीची मूर्ती आणायला जाताना आक्रीत घडलं, टँकरने उडवले, भक्ताचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT