OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाकेंचा एल्गार; राज्यपातळीवर घेतला मोठा निर्णय

Laxman Hake on OBC Reservation : ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाकेंनी एल्गार पुकारला आहे. हाके यांनी राज्यपातळीवर मोठा निर्णय घेतला आहे.
Laxman Hake News
Laxman Hake Saam tv
Published On
Summary

मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केल्याने ओबीसी आंदोलक आक्रमक

लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी बांधव राज्यभर संघर्ष यात्रा सुरू करणार

ओबीसी बैठकीत आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यात आली

हाकेंची सरकारला ओबीसी आरक्षणावर स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी

सचिन जाधव, साम टीव्ही

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीवरून ओबीसी आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी लक्ष्मण हाके यांनी एल्गार पुकारला आहे. राज्यातील तालुका तालुक्यातील संघर्ष यात्रा सुरू करण्याचं ठरवल्याचा निर्णय लक्ष्मण हाके यांनी घेतला.

Laxman Hake News
Manoj Jarange Patil : सरकारने भंगार खेळ खेळणं बंद करावं, आरक्षण देऊन टाकावं; आझाद मैदानातून मनोज जरांगे काय म्हणाले?

राज्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांच्या मागणीवर आज पुण्यात ओबीसी बैठक संपली. या बैठकीला लक्ष्मण हाके,मंगेश ससाणे,मृणाल ढोले पाटील उपस्थित होते. या ओबीसी बैठकीनंतर लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. लक्ष्मण हाके म्हणाले, 'ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी मनोज जरांगे आमदार खासदार गेले, याबाबत त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत करावी'.

'महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये असे सांगितले आहे, ते येत्या दोन दिवसात सांगावे. सर्वपक्षीय आमदार खासदार उघडपणे भूमिका घेत आहे. आम्हाला ओबीसी आरक्षणाबाबत भीती वाटत आहे. असुरक्षिततेची भावना आहे. राज्यातील तालुका तालुक्यातील संघर्ष यात्रा सुरू करण्याचे ठरवले आहे, असे ते म्हणाले.

'आमचे नेत्यांशी चर्चा करून आम्ही संघर्ष यात्राबाबत चर्चा करून कुठून सुरू करायची, कधी सुरू करायची, याबाबत निर्णय घेणार आहोत. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी एल्गार केला आहे. ओबीसीतून आरक्षण कसे देणार, त्यामुळे सगळे गोंधळलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आम्हाला न्याय मिळेल का याचा हा प्रश्न आहे, असे हाके यांनी सांगितले.

Laxman Hake News
Relationship Dispute : लग्नाचं आश्वासन देऊन ठेवलेले शारीरिक संबंध दुष्कर्म ठरत नाहीत : कोर्ट

'आम्ही संघर्ष यात्रा काढून सरकारला दखल घ्यावी लागले. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राज्यभर संघर्ष यात्रा काढणार आहे. मुंबईपर्यंत यात्रा नेणार आहे. राज्य सरकारला मग झेपणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देताय, तर ते कसं हे सरकारने सांगावे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाला तोडीस तोड जबाब देण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी समाज तयार आहे, असेही हाकेंनी सांगितले.

Laxman Hake News
Shocking : बापरे! ९८ टक्के भरलेल्या धरणावर कारचालकाची स्टंटबाजी; व्हिडिओ पाहून फुटेल घाम, VIDEO

'सरकार पायघडी घालत आहे. शिंदे समिती का भेटते,काहीही पुरावे नाहीत. शिंदे समितीने बेकायदा काम केलं आहे. ओबीसीकडे दुर्लक्ष केलं तर चालणार नाही. आमच्या ओबीसीच्या सगळ्या संघटना आजच्या बैठकीत सहभागी झाल्या आहेत, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com