Maharashtra Latest News Saamtv
महाराष्ट्र

Latur Accident: ओव्हरटेकच्या नादात भयंकर घडलं, भरधाव कारची उभ्या ट्रॅक्टरला धडक, २ जागीच ठार; ३ जखमी

Ausa Omerga Highway Accident News: लातूरमध्ये भरधाव कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत. औसा- उमरगा महामार्गावर ही घटना घडली.

Gangappa Pujari

लातूर, ता. २७ जुलै २०२४

लातूर जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. लातूरमधील औसा- उमरगा महामार्गावर ट्रॅक्टर आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सुरू आहे. काल रात्री लातूरमध्ये भरधाव कार आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झालेत. ओव्हरटेक करणयाच्या नादातून ही दुर्घटना झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, औसा -उमरगा महामार्गावरच्या फत्तेपुर पाटीजवळ रात्री 8:30च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करताना कारने थांबलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लातूर येथे पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली तसेच मृतदेह ताब्यात घेतले. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. ओव्हरटेक करण्याची एक चूक नडली अन् दोघांचा जीव गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Songwriter Death: प्रसिद्ध गीतकाराचे निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, संगीतविश्वात शोककळा

कोहिनूर हिऱ्याची किंमत किती आहे?

Local Bodies Election Supreme Court: ठरलं! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींबाबत सर्वात मोठी बातमी, या तारखेपर्यंत होणार निवडणुका | VIDEO

Jalna Heavy Rain : जालन्यात पावसाचा कहर; १५ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी, शेतीचे अतोनात नुकसान

Hardik Pandya Rumoured Girlfriend : हार्दिकच्या आयुष्यात स्टायलिश अभिनेत्रीची एन्ट्री? कोण आहे पंड्याची नवी गर्लफ्रेंड?

SCROLL FOR NEXT