संदीप भोसले
लातूर : लातूर जिल्ह्यात देखील पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. यात लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील तिरू नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्या आहे. यामुळे पुलावरून असलेली वाहतूक बंद झाल्याने जवळपास २८ गावांचा संपर्क तुटला आहे. नवीन पुलाचे काम मंजूर असूनही काम झाले नसल्याने तीरु नदीवर पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली होती.
राज्यातील अनेक भागात (Heavy Rain) मुसळधार पाऊस सुरु आहे. विदर्भात तर पावसाने हाहाकार माजवला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यानुसार लातूर (Latur) जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. प्रामुख्याने जळकोट तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिरु नदीला पाण्याचा प्रवाह अधिक वाढल्याने नदीवर तात्पुरता बांधण्यात आलेला पूल वाहून गेला आहे.
तिरू नदीला पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने पुल वाहून गेला आहे. यामुळे अतनूर गावासह जवळपास २८ गावांचा संपर्क तुटला आहे. एक वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या नवीन पुलाचे काम अद्यापही सुरू झाले नसल्याने नदीवर पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली. मात्र पुल मजबूत आणि टिकावू नसल्याने पुल वाहून गेला आहे. जवळपास नदीच्या पलीकडील गव्हाण, मेवापूर, चिंचोली, गुत्ती, गुंजी, नळगीर, उदगीर, जळकोट, बाराहाळी, मुखेड या गावांचा संपर्क तुटला आहे. नदीतील पाणी कमी झाल्यानंतर वाहतुकीसाठी रस्त्याचे काम करण्यात येईल; अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात येते आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.