IPL 2026 : आयपीएलच्या १० संघांचे कॅप्टन ठरले, तुमच्या फेव्हरिट टीमचा कर्णधार कोण? जाणून घ्या

IPL 2026 Team Captain List : आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होत असून, सर्व संघांचे कर्णधार निश्चित झाले आहेत. २८ मार्चपासून ही स्पर्धा सुरू होत आहे. तुमच्या फेव्हरिट संघाचे कर्णधार कोण, ते जाणून घ्या...
हार्दिक पंड्या ते रजत पाटीदार, ऋतुराज गायकवाड....तुमच्या फेव्हरिट आयपीएल संघाचा कर्णधार कोण?
IPL 2026 Team Captain Listsaam tv
Published On

IPL 2026 Captains List: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग अशी ओळख असलेल्या आयपीएल स्पर्धेला २८ मार्चपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात महासंग्राम होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या १० संघांच्या कर्णधारांची नावे निश्चित झाली आहेत. या पर्वासाठी सर्व संघांच्या कर्णधारांची नावे जाहीर झाली आहेत.

मुंबई, चेन्नईचा कर्णधार कोण?

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहेत. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी यावर्षी हार्दिक पंड्या सांभाळणार आहे. मागील दोन पर्वांपासून हार्दिक पंड्या कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज हा संघही पाच वेळा चॅम्पियन ठरला आहे. यावर्षीही सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड असेल. गेल्या वर्षी ऋतुराजने काही सामन्यांमध्ये नेतृत्व केले होते. गायकवाड जखमी झाल्यानंतर धोनीनं ही जबाबदारी सांभाळली होती.

राजस्थान रॉयल्सने युवा खेळाडूवर सोपवली जबाबदारी

मुंबई, चेन्नईनंतर कोलकाता नाईट रायडर्स हा संघ आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरलाय. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा जेतेपद पटकावलं आहे. यावर्षीही अजिंक्य रहाणे कर्णधार असेल. गेल्या वर्षीही त्याने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, हा संघ टॉप ४ मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला होता. राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व रियान पराग करणार आहे. गेल्या वर्षी रियाननं काही सामन्यांत संघाचं नेतृत्व केलं होतं. या युवा खेळाडूकडंही कर्णधारपदाचा अनुभव आहे.

रजत पाटीदार बेंगळुरूचा कर्णधार

सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कर्णधारपदी पॅट कमिन्स असेल. गुजरात टायटन्सने पुन्हा एकदा शुभमन गिलवर विश्वास दाखवला आहे. मागील दोन पर्वांपासून गिलकडे नेतृत्व आहे. यावर्षीही तो नेतृत्व करताना दिसणार आहे. मागील वर्षीचा चॅम्पियन संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचं नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे.

हार्दिक पंड्या ते रजत पाटीदार, ऋतुराज गायकवाड....तुमच्या फेव्हरिट आयपीएल संघाचा कर्णधार कोण?
BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

तीन कर्णधारांकडे आयपीएल जिंकण्याची पहिल्यांदाच संधी

गेल्या वर्षीचा उपविजेता संघ पंजाब किंग्जचं नेतृत्व पुन्हा श्रेयस अय्यरकडे देण्यात आले आहे. अय्यरच्या नेतृत्वात संघ मागील मोसमात फायनलमध्ये पोहोचला होता. पंजाबने अद्याप जेतेपद पटकावलेले नाही. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सलाही पहिल्या जेतेपदाची संधी आहे. यंदाच्या पर्वात अक्षर पटेल संघाचं नेतृत्व करणार आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचं कर्णधारपद पुन्हा ऋषभ पंतकडे असेल.

हार्दिक पंड्या ते रजत पाटीदार, ऋतुराज गायकवाड....तुमच्या फेव्हरिट आयपीएल संघाचा कर्णधार कोण?
IPL 2026 सुरू होण्याआधीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, दिग्गजानं सोडली संघाची साथ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com