रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात पुणे-बेंगळुरू महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याचं समोर आलंय. पुणे बेंगलोर महामार्गावरील घुणकी गावाजवळ असणाऱ्या वारणा नदीच्या पात्रात चारचाकी गाडी कोसळली. वळणाचा अंदाज न आल्याने कार वारणा नदी पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली. काल २५ जुलै रोजी रात्री क्रेनच्या साहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात आलीय.
पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात
मात्र, वाहन चालक बेपत्ता (Accident News) आहे. केवळ गाडीच्या जीपीएसमुळे ही गाडी वारणा नदीत पडल्याचं उघडकीस आलंय. नजीर कांकनडगी, असं वाहनचालकाचं नाव आहे. काल २५ जुलै रोजी सायंकाळी पोलिसांनी ही गाडी वारणा नदी पात्राच्या बाहेर काढली. परंतु वाहन चालकाचा कोणतीही माहिती अजून मिळालेली नाही, पोलीस त्याचा शोध घेत आहे.
भरधाव कार वारणा नदीत कोसळली
नजीर कांकनडगी, हा सेंट्रींग कॉन्ट्रॅक्टचं काम करतो. तो बुधवारी २४ जुलै रोजी काही लोकांना सोडण्यासाठी चारचाकी वाहनातून कोल्हापूरला गेला होता. त्यांना सोडून परत येताना रात्री बाराच्या सुमारास घूनकी गावाजवळ त्याचा अपघात (Warana River) झालाय. रात्रीच्या अंधारात त्याची गाडी वारणा नदीच्या पुलावरून कठडा तोडून नदीमध्ये कोसळली. गाडीला जीपीएस प्रणाली असल्याने ही गाडी नेमकी कुठे गेली? हे शोधण्यास मदत झालीय.
चालक बेपत्ता
कोल्हापूरमध्ये मागील तीन-ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू (Pune Bangalore Highway) आहे. या जोरदार पावसाने अनेक दुर्घटना घडल्याचं देखील समोर आलंय. अशीच घटना पुणे बेंगळुरू महामार्गावर देखील घडली आहे. वळणाचा अंदाज न आल्याने कार थेट वारणा नदी पात्रात कोसळली. यावेळी पुलाचा कठडा तोडून कार खाली कोसळल्याचं समोर आलंय. वाहन चालकाचा शोध सध्या सुरू (Kolhapur News) आहे. गाडीत असलेल्या जीपीएसमुळे पोलिसांना गाडीचा शोध लागला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.