Konkan Bans Land Sale to Outsiders Saam Tv
महाराष्ट्र

Konkan: 'गावची जमीन गावातच', कोकणात परप्रांतीयांना गावबंदी

Konkan Bans Land Sale to Outsiders: कोकणातल्या कणकवलीमध्ये परप्रांतीयांना गावबंदी करण्यात आली आहे. गावची जमीन गावातच राहणार असून ती परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला.

Priya More

Summary -

  • कोकणातील गावांचा ऐतिहासिक निर्णय

  • परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी

  • स्थानिक हक्क आणि रोजगार संरक्षणावर भर

  • इतर गावांमध्येही अशाच निर्णयांना प्रतिसाद

परप्रांतीयांचा मुद्दा फक्त मुंबई, ठाण्या पुरता नाही. कोकणातही परप्रांतीयांची घुसखोरी आणि त्यांनी मांडलेलं बस्तान हा ज्वलंत प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर कोकणातल्या एका गावाने ऐतिहासिक निर्णय घेतलाय. पाहूया ग्रामस्थांनी भूमिपुत्रांसाठी काय निर्णय घेतलाय ?

मुंबईत परप्रांतीयांविरोधातला राग अनेक घटनांमधून वारंवार समोर येत असतो. मात्र आता कोकणातही परप्रांतीयांची संख्या वाढू लागली आहे. अगदी मासेविक्रीपासून ते अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायात परप्रांतीय लोक दिसून येत आहेत. पण इथंपर्यंत ते मर्यादीत नाही तर अनेक गावांमध्ये परप्रांतीय जमीन खरेदी करत आहेत.परप्रांतीयांच्या तावडीतून कोकण वाचवण्याच्या उद्देशाने कणकवली तालुक्यातील असलदे गावात परप्रांतीयांना जमीन विक्रीस बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय एकमताने घेण्यात आला.

कोकणात कोकण रेल्वे विकासाची गंगा घेऊन आली. मात्र त्याचबरोबर परप्रांतीयांचे आक्रमणही झाले. परप्रांतीय कामगार आणि मच्छिमारांच्या घुसखोरीमुळे कोकणात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळेच असलदे गावात सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत स्थानिक तरुणांना मुंबई, पुण्याला न जाता गावात किंवा परीसरातच कसा रोजगार मिळेल त्यादृष्टीनेही उपाययोजना करण्यावर महत्वाची चर्चा झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग तालुक्यातील कोलझर ग्रामपंचायत पाठोपाठ असलदे गावाने घेतलेल्या या निर्णयाला तळकोकणात प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील मोरवणे गावानेही जमीन विकायची असल्यास ती केवळ गावातील स्थानिक लोकांनाच विकली जावी, असा ठराव ग्रामसभेत मंजूर केला आहे.

कोकणात 2016 मध्ये रिफायनरी प्रस्तावित करण्यात आली. रत्नागिरीतील बारसू, नाणार येथे त्याला तीव्र विरोध झाला. मात्र कोकणातील जमिनींना मोठा भाव आलाय. अनेक परप्रांतीयांनी आणि धनदांडग्यांनी इथल्या जमिनींवर डल्ला मारलाय. याच पार्श्वभूमिवर कोकणातील गावांचा हा निर्णय केवळ जमीन व्यवहारांपुरता मर्यादित नसून पर्यावरण संरक्षण, स्थानिक हक्क आणि सांस्कृतिक ओळख जपण्याच्या दृष्टीने शएक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'झालमोडी'नं दिली 'मछली'ला मात, बंगालमध्ये भाजपच्या विजयाची कारणं काय?

निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिलीची प्रतिक्रिया, म्हणाले सुनेत्रा पवार..;

West Bengal Result: भाजपची उद्या तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांच्या नावावर होणार शिक्कामोर्तब,शपथविधीचीही तारीख ठरणार?

Election Result Live: ममता बॅनर्जी पिछाडीवर, भाजप उमेदवाराची मोठी आघाडी

मालेगाव-सटाणा शहराचा होणार कायपालट; रस्ता चौपदरीकरणाने अपघाताचा धोका टळेल, रोजगार अन् पर्यटन वाढेल

SCROLL FOR NEXT