Shreya Maskar
रत्नागिरी हे कोकण किनारपट्टीवरील एक अत्यंत सुंदर ठिकाण आहे. जे 'कोकणचा मोती' म्हणून प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात रत्नागिरीत ट्रिप प्लान करा.
गावखडी बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळ असलेला एक एकांत, निसर्गरम्य आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूटचा आनंद घेऊ शकता.
कोकण किनारपट्टीवर वसलेला गावखडी समुद्रकिनारा पाइनच्या जंगलासाठी, हिरव्यागार टेकड्यांसाठी आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
शांततेच्या शोधात असलेल्या निसर्गप्रेमींसाठी गावखडी बीच एक उत्कृष्ट ठिकाण आहे. जिथे मऊ वाळू, स्वच्छ पाणी पाहायला मिळेल. येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहून तुमचे मन मोहून जाईल.
गावखडी बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यात तुम्ही कोकणता गेल्यावर येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.
गावखडी बीच ऑलिव्ह रिडले कासवांच्या संवर्धनासाठी देखील प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान कासवे अंडी घालण्यासाठी येतात, ज्यांचे रक्षण 'कासवमित्र' आणि वनविभाग करतात.
गावखडी बीच जवळ पूर्णगड किल्ला वसलेला आहे. पूर्णगड हा किल्ला मुचकुंदी नदीच्या खाडीकाठी आणि अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर टेकडीवर स्थित आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.