tuljapur, Dharmik Paryatan saam tv
महाराष्ट्र

Dharmik Paryatan: तुळजापूर, भिमाशंकर, कौंडण्यपूर, जेजूरी, त्र्यंबकेश्वरसह राज्यातील मंदिरांत भाविकांची मांदियाळी (पाहा व्हिडिओ)

अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास या निमित्ताने राज्यभरातील मंदिरात भाविकांची देव दर्शनासाठी गर्दी आहे.

Siddharth Latkar

- साम टीव्हीचे ठिक-ठिकाणचे प्रतिनिधी

Maharashtra News : सलग सुट्ट्या आणि अधिक मासामुळे राज्यभरातील विविध देव देवतांच्या मंदिरात भाविकांची अलाेट गर्दी दिसून येत आहे. विशेषत: राज्यातील महानगरांमधील लाेक तुळजापूर, काेल्हापूर येथे त्यांच्या कूलदैवताचे दर्शन घेण्यासाठी तसेच शिर्डी, पंढरपूर, भिमाशंकर आदी ठिकाणी देवाच्या दर्शनासाठी आले असल्याचे चित्र आहे.(Maharashtra News)

दीड तासांत तुळजाभवानीचे दर्शन

सलग सुट्ट्या आणि अधिक मासामुळे तुळजापुर येथील तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. हे मंदिर बावीस तास दर्शनासाठी खुले ठेवले गेले आहे. तुळजा भवानी मंदिर संस्थान भाविकांची गैरसाेय हाेऊ नये याची काळजी घेत आहे. साधारणत: एक ते दीड तासांत भाविकांना आईचे दर्शन हाेत आहे.

भिमाशंकरला हर हर महादेवचा गजर

आधिक मासातला शेवटचा सोमवार असल्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भिमाशंकरला आज (साेमवार) भाविकांची गर्दी आहे. या मंदिरात पहाटे शिवलिंगावर दुग्धाभिषेक महाआरती करत ढमरु आणि शंख नाद करण्यात आला. हर हर महादेव ,ओम नम: शिवाय म्हणत पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी येऊ लागले आहेत.

हिरवागार निसर्ग पांढरं शुभ्र धुक्यात वेढलेल्या भिमाशंकर परिसरात भक्तीमय वातावरणात भाविक आधिक मासाची बारा ज्योतिर्लिंगाची यात्रा पुर्ण करत आहेत. यानिमित्ताने देशाच्या कानाकोपऱ्यातुन येणा-या भाविकांनी भिमाशंकरला गर्दी झाली आहे.

वर्धा नदी पात्रात भाविकांचे स्नान

अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास या निमित्ताने विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कौंडण्यपूर येथे रुक्मिणीच्या मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे. रुक्मिणीचे माहेरघर म्हणून कौंडण्यपुरची ओळख आहे. या महिन्यात भाविक तीर्थक्षेत्रावरील पवित्र स्नानाला अधिक महत्त्व देतात. रुक्मिणी मंदिराला लागून असलेल्या वर्धा नदी पात्रात पवित्र स्थानासाठी भाविकांची गर्दी हाेती.

जेजुरीसह काेल्हापूरात भाविकांची गर्दी

जेजुरीत देखील भाविकांची गर्दी पाहयला मिळत आहे. गेल्या दाेन दिवसांत सुमारे लाखापेक्षा अधिक भाविक येथे दर्शनास आल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. काेल्हापूरातील अंबाबाई मंदिरातील धार्मिक अनुष्ठानाची सांगता नुकतीच झाली. पंचगंगा घाटावर अवभृत स्नानाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली हाेती.

त्र्यंबकेश्वर फुलले

नाशिकच्या प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर मंदिरा हजारो भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. भाविकांच्या दर्शन सोयीस्कर व्हावे यासाठी मंदिर व्यवस्थापनाकडून नियोजन करण्यात आले आहे. लाईव्ह दर्शनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर देशभरात प्रसिद्ध आहे. देशातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यातच विकेंड आणि सलग सुट्ट्या असल्याने भाविकांनी कुटुंबासह दर्शनासाठी हजेरी लावली आहे.

साईंच्या चरणी

मावळ तालुक्यातील प्रति शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरगावं येथे साई भक्तांची मांदियाळी पहावयास मिळाली. सुट्टी म्हंटल की अनेकांना फिरण्याचे वेध लागतात मात्र अनेक पर्यटन स्थळे हाऊस फुल्ल झाली आहे.

काही भाविकांनी देव दर्शनाला अधिक महत्त्व दिले आहे. त्यामुळे साईंच्या दरबारात गर्दी होऊ लागली आहे. ज्या भक्तांना शिर्डीत जाण्यास मिळत नाही ते भक्त शिरगावच्या साई बाबांच्या दर्शनाला हमखास येतात हेच गर्दीतून दिसत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT