Independence Day 2023: दहशतवादाच्या संशयातून Kolhapur हिटलिस्टवर? NIA चा तीन ठिकाणी छापा, तिघांना घेतलं ताब्यात (पाहा व्हिडिओ)

नागरिकांना संशयास्पद हालचाली लक्षात आल्यास नजीकच्या पाेलिस ठाण्यात कळवावे.
Kolhapur, NIA Raids In Kolhapur
Kolhapur, NIA Raids In Kolhapursaam tv

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : दहशतवाद्याच्या संशयातून कोल्हापूर हिटलिस्टवर असल्याची माहिती समाेर आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पाेलिस यंत्रणा सतर्क राहिली आहे. देशातील पाच राज्यात एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) छापेमारी केली. त्यामध्ये काेल्हापूरातील तीन ठिकाणांचा समावेश आहे. एनआयएने काही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चाैकशी सुरु आहे. (Maharashtra News)

Kolhapur, NIA Raids In Kolhapur
महाराष्ट्र नव्हे हे तर सुलतानी सरकार, 'हा' निर्णय म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ : आमदार कैलास पाटील

पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या दहशतवादी संघटनेबराेबर संपर्कात असल्याच्या संशयावरून एनआयएच्या अधिकारी यांनी रविवारी कोल्हापूर शहरासह इचलकरंजी, हुपरी येथे छापेमारी केली. यामध्ये एनआयएच्या अधिकारी यांनी तिघांना ताब्यात घेतले. या तिघांकडून महत्त्वाची कागदपत्रे, शस्त्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू असे साहित्य जप्त केले आहे. या तिघांपैकी दोघे ३० ते ३५ वयोगटातील आहेत. तर अन्य एकाचे वय साधारणत: ४५ असल्याचे सांगितले जात आहे.

Kolhapur, NIA Raids In Kolhapur
Khambatki Ghat Accident : 'खंबाटकी' नजीक कॅनाॅलमध्ये कार काेसळली, धाडसी पाेलिसांसह ग्रामस्थांनी वाचविले चाैघांचे प्राण

कोल्हापूर हिटलिस्टवर

या कारवाईनंतर दहशतवाद्यांचा राेख कोल्हापूर जिल्हा आहे की काय जिल्हा हिटलिस्टवर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाच्या तपासासाठी एनआयएचे पथक कोल्हापुरात येऊन गेली होती. हुपरीतील घटनेनंतर देखील एनआयएच्या पथकाने शहरात छापा टाकला होता.

नागरिकांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे गरजेचे

एनआयएची (nia) नजर काेल्हापूरकडे असल्याने शहर आणि जिल्हा सुरक्षित आहे परंतु नागरिकांनी देखील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत पाेलिस यंत्रणेस सहकार्य करणे आवश्यक बनले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com