महाराष्ट्र नव्हे हे तर सुलतानी सरकार, 'हा' निर्णय म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ : आमदार कैलास पाटील

शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे आधीच संकटात असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.
mla kailas patil, eknath shinde
mla kailas patil, eknath shindesaam tv

- बालाजी सुरवसे

Mla Kailas Patil News : उपसा पद्धतीने पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी यापूर्वी १२० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे वसुली केली जात होती. कॅनॉल व इतर ठिकाणाहुन पाणी घेणाऱ्यांना हेक्टरी १२०० रुपये व त्यावर २० टक्के स्थानिक सेसने पाणीपट्टी वसूल करण्यात येणार असल्याचा फतवा सरकारने काढला आहे. शेतकरी सध्या अडचणीत असताना त्यांच्या पाण्यावरील कर दहा पट्टीने वाढवुन सुलतानी सरकारने शेतकऱ्यावर जुलुम चालविल्याची भावना आमदार कैलास पाटील (mla kailas patil) यांनी व्यक्त केली आहे. (Maharashtra News)

mla kailas patil, eknath shinde
Cotton Price : तब्बल नऊ महिन्यांनंतर मानवतला कापसू खरेदी बंद, बाजार समितीत चार लाख सात हजार क्विंटल कापसाची आवक

आमदार कैलास पाटील म्हणाले जाहीरातबाज सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत दररोजच वेगवेगळ्या पध्दतीने अन्याय करताना दिसत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु अशा घोषणा काही वर्षापासुन सातत्याने केल्या. नवीन सरकार आल्यापासुन शेतकऱ्यांचे सरकार असल्याचा जप करत आहे.

mla kailas patil, eknath shinde
Sambhajinagar Adarsh Scam : 'आदर्श' चे अध्यक्ष अंबादास मानकापेच्या नातेवाईकांना अटक

शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढलेच नाही पण उत्पादन खर्च वाढविण्यात सरकारने कोणतीही कसुर ठेवली नाही. सोयाबीनसह अन्य पिकाच्या दरामध्ये कायम काढणीवेळी घसरण करण्याचा सरकारने जाणीवपुर्वक प्रयत्न केल्याचे दिसुन आले आहे. नुकसान होऊनही वर्षभर मदत मिळत नाही,सततच्या पावसाची मदत देण्याअगोदर सरकार 13 हजार 600 रुपयाने देणार होते.

mla kailas patil, eknath shinde
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

शासन निर्णय काढल्यानंतर रक्कम साडेआठ हजारावर आली प्रत्यक्ष मदत येते तेव्हा ती रक्कम चार ते पाच हजार रुपयेच असते. अशा असंख्य गोष्टी सांगण्यासारख्या आहेत असे पाटील यांनी सांगुन पाणीपट्टीच्या दरामध्ये दहा पट्टीने वाढ केल्याचे म्हटले आहे.

रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची मागणी जास्त असते. प्रकल्पांवरून रब्बी हंगामासाठी दोन ते तीन व उन्हाळी हंगामासाठी पाच ते सहावेळा उपलब्ध पाणी पुरविणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात हंगामनिहाय अपेक्षीत पाणी पुरविले जात नाही त्यासाठी पाणीपट्टी आकारली जाते.

mla kailas patil, eknath shinde
Samruddhi Mahamarg News : डाॅ. दाभाेलकरांच्या मागणीनंतर स्वामी समर्थ भक्तावर गुन्हा दाखल, समृद्धी महामार्गावर अपघात होणार नाही केला हाेता दावा (पाहा व्हिडिओ)

आधी पाणीपट्टीनुसार करवसुली केली जात होती आता हेक्टरनिहाय दर ठरविले गेले. पाणीपट्टीत वाढ व त्याला स्थानिक सेसची जोड देण्याचा फतवा शासनाने काढला आहे. वीज दरात भरमसाठ वाढ, भारनियमन, विजेचा तुटवडा अशा असंख्य समस्येने शेतकरी त्रस्त आहे. त्यात गेल्या काही वर्षापासुन शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असुन या काळात एवढी वाढ करणे म्हणजे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

मीटरची सक्ती

पाण्याच्या मोटारीला वॉटर मीटर बसविण्यास जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शेतकऱ्यांना (farmers) सक्ती केली आहे. त्या मीटरची किंमत पाच हजार रुपये असुन मीटर यातुन नेमक कोणाचे हित साधायचे आहे असा प्रश्न निर्माण होत असल्याची शंका आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com