Kolhapur's CPR Hospital : काेणी औषध देता का औषध, कोल्हापुरातील 'सीपीआर' च सलाईनवर

कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून सीपीआरची ओळख आहे.
CPR Hospital, Kolhapur, Medicines
CPR Hospital, Kolhapur, Medicinessaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR Hospital Kolhapur) हे पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं सरकारी रुग्णालय आहे. मात्र या रुग्णालयात औषधांचा तुटवडा जाणवू लागलेला आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना औषधाच्या चिट्ठी घेऊन बाहेरच्या मेडिकल शॉपी मधून औषध उपलब्ध करण्याची वेळ येत आहे.

CPR Hospital, Kolhapur, Medicines
Ravikant Tupkar vs Raju Shetti : अखेर राजू शेट्टींनी रविकांत तुपकरांना सुनावलं

सीपीआर येथे उपचार घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सीमा भागातले गोरगरीब रुग्ण दररोज येत असतात. या सर्व रुग्णांना माफक दरात या रुग्णालयामार्फत उपचार देण्यात येतात. मात्र काही दिवसांपासून हाफकिन द्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या औषधांमध्ये तुटवडा जाणवू लागलेला आहे. त्यामुळे याचा ताण आता रुग्णालया बरोबरच रुग्णांवरही येताना दिसत आहे.

CPR Hospital, Kolhapur, Medicines
Satara News : ज्येष्ठ विचारवंत डाॅ. आ. ह. साळुंखेंची 12 ऑगस्टला बीजतुला : अभिनेते सयाजी शिंदे

जी बी एस सारख्या आजाराने त्रस्त असणारे रुग्ण सध्या सीपीआर मध्ये दाखल होत आहेत. त्यांना नियमित इंजेक्शन द्यावी लागतात त्यात खंड पडून चालत नाही. दोनच दिवसांपूर्वी ही औषध संपली होती. नवीन औषध खरेदी करायची म्हटलं की सीपीआरकडे बजेट नाही तर हाफिन्स कडून येणारा पुरवठा हा अनियमित झाल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत.

त्यामुळे राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील औषध पुरवठा नियमित करावा अशी मागणी आता होत आहे.

CPR Hospital, Kolhapur, Medicines
Sambhajiraje Chhatrapati News : भाजप मजा बघतयं, खेळवतयं ! असं का म्हणाले संभाजीराजे छत्रपती (पाहा व्हिडिओ)

कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून सीपीआरची ओळख आहे. 650 बेडचं हे हॉस्पिटल असून दररोज पश्चिम महाराष्ट्रातल्या किमान तीन ते चार हजार रुग्णांची या रुग्णालयात ये - जा असते. विविध तपासण्यासह गंभीर आजारांवर इथे उपचार केले जातात. मात्र इतक्या मोठ्या रुग्णालयावर शासनाकडून येणारा औषध पुरवठा अनियमित झाला तर रुग्णांवरही त्याचे गंभीर परिणाम होत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com