Sambhajinagar News  Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीनेच अनेक महिलांना फसवलं, योजनेच्या नावाखाली गरीबांकडून उकळले पैसे; पोलिसांत गुन्हा

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेने लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

माधव सावरगावे, संभाजीनगर

महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून या योजनेमुळे चांगलीच चर्चा होत आहे. अनेक ठिकाणी या योजनेच्या नावाखाली महिलांची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेने लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली अनेक महिलांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेच्या मंजुरीसाठी दलाली करणाऱ्या एका महिलेविरोधात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या नावे पैसे घेणाऱ्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार लाडकी बहिण योजनेसाठी बहिणींची आर्थिक लूट केल्याप्रकरणी या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची आर्थिक लूक करणारा हा राज्यातील पहिला गुन्हा आहे.

लाडकी बहीण योजनेसह शासनाच्या विविध योजनांचा लाभ मंजूर करून देण्यासाठी निराधार, गरीब महिलांकडून पैसे उकळणाऱ्या संभाजीनगर जिल्ह्यातील वंदना म्हस्के या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. वंदना मस्के ही महिला प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाध्यक्ष असल्याचे लेटर हेड वापरते. त्या पदावरून तिने यापूर्वी उपोषणाचा इशारा दिला होता. शिवाय याच लेटरहेडचा वापर करून ती शासनाच्या विविध कार्यालयातून माहिती मागवत असते.

वंदना म्हस्के ही गरीब महिलांना लुटत असल्याचे गाऱ्हाणे काही महिलांनी तहसीलदारांसमोर मांडले. त्यानंतर तहसीलदारांनी महिलांचे जबाब घेत पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वंदना म्हस्के या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अनुदान मंजूर करण्यासाठी, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळून देण्यासाठी वंदना मस्के ही गोरगरीब महिलाकडून पैसे उकळत होती. पैसे देऊन देखील अनुदान खात्यावर जमा होईना म्हणून महिलांनी वंदना म्हस्के यांना विचारले असता त्या धमक्या देत असल्याने महिलांनी तहसीलदारांची भेट घेत तक्रार दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

PM Kisan Yojana: महत्त्वाची बातमी! या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा पुढचा हप्ता; कारण काय?

Raj Thackeray: राज ठाकरेंनी 'मुळशी पॅटर्न'फेम अभिनेत्याला खडसावलं! नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT