डेंग्यूसदृश्य आजाराने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
Sambhajinagar News Saam Tv

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू, शहरात चिंतेचं वातावरण

13 Year Old Girl Death Due To Dengue Like Desease: छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्युसदृश्य आजाराने एका मुलीचा मृत्यू झालाय. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
Published on

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये डेंग्यूसदृश आजाराने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. झरा मोहम्मद अब्दुल हादी, असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. उलट्या, जुलाब आणि तापामुळे या मुलीवर गेल्या दोन दिवसांपासून एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना तिने अखेरचा श्वास घेतलाय. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

डेंग्युसदृश्य आजाराने मृत्यू

राज्यात सध्या डेंग्यू रूग्णांची संख्या वाढत (Chhatrapati Sambhajinagar) आहे. पावसाला सुरूवात झाल्यानंतर डेंग्यू रूग्णसंख्येत वाढ होत असल्याचं समोर आलंय. डेंग्यूच्या निदानासाठी इलायझा नावाची टेस्ट आवश्यक आहे. 'एनएस-१' हे कोणत्याही व्हायरलमध्ये पॉझिटिव्ह येत असते. डेंग्यूमध्ये प्लेटलेट कमी होत असतात. सदर मुलीचे प्लेटलेट हे सामान्य होते, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडले यांनी दिलीय. त्यामुळे नेमका कशामुळे या मुलीचा मृ्त्यू झालाय, हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु डेंग्युसदृश्य (Dengue) आजाराने तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातंय.

नाशिकमध्ये डेंग्यूचा प्रकोप कायम

नाशिक शहरात डेंग्यूचा प्रकोप कायम असल्याचं समोर आलंय. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. डेंग्यूच्या रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेवून पालिकेच्या आरोग्य यंत्रणा कामाला लागल्या (Nashik News)आहेत. डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता शहरात डेंग्यू डासांच्या उत्पत्ती स्थळांची शोध मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

 डेंग्यूसदृश्य आजाराने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
Nashik Dengue Update: नाशिककरांनो काळजी घ्या! शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३६५ वर; आरोग्य विभाग अलर्ट

डेंग्यू उत्पत्ती स्थळासाठी संबंधितांना दंड

डेंग्यू उत्पत्ती स्थळासाठी संबंधितांना आता प्रतिस्पॉट ५०० रुपये दंड, तर बिल्डरांना १० हजार रुपये दंड ठोठावला जाणार आहे. ४९२ जणांकडून डेंग्यू उत्पत्ती स्थळासाठी १ लाख १३ हजारांचा दंड वसूल करण्यात (Dengue Patient) आलाय. डेंग्यू उत्पत्ती स्थळ शोधून कारवाईसाठी मलेरिया विभाग तयार करण्यात आलाय. तर आशा सेविकांसह जवळपास ७०० जणांचं पथक कार्यान्वित झालेलं आहे. पुण्यात देखील डेंग्युचे रूग्ण वाढत आहेत.

 डेंग्यूसदृश्य आजाराने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
Amravati Dengue News : अमरावती जिल्ह्यात डेंग्यूचे ७२ तर चिकनगुणीयाचे ३२ रुग्ण; जिल्हा रुग्णालयात खाटा पडतंय अपूर्ण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com