Ladki Bahin Yojana Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: पोलिस, शिक्षक अन् सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले लाडकीचे ₹१५००; सरकार करणार कारवाई

Ladki Bahin Yojana Government Employees Get Benefit: लाडकी बहीण योजनेत सरकारी कर्मचाऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या महिलांचे लाभ बंद करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आता पैसे वसूल केले जाणार आहेत.

Siddhi Hande

सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ

५ हजार सरकारी कर्मचारी, ३ हजार शिक्षकांना वगळले

या कर्मचाऱ्यांकडून योजनेच्या लाभाची रक्कम वसूल करणार

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना गैरफायदा घेतला आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या महिलांवर आता कारवाई केली जाणार आहे.५ हजार सरकारी कर्मचारी, ३ हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी करण्यात येत आहे. पुढील महिनाभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होणार असून त्या त्या विभागांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात येणार आहे.

या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच आहेत. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचारी, शिक्षकांकडून पैसे वसूल केले जाणार असून त्यांची पगारवाढही रोखण्यात येणार आहे.

पाच लाख महिलांना वगळले

सुमारे पाच लाख महिला लाभार्थीनी कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही 'लाडकी बहीण'चे पैसे लाटले आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

दीड लाख महिलांना वगळले

वयाच्या २१ वर्षांवरील आणि ६५ वर्षांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येतो. वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांना या योजनेतून वगळले जात आहे. दर महिन्याला अशा १० ते १२ हजार महिला या योजनेतून बाद होत आहेत यासाठी सॉफ्टवेअरमध्ये तशी रचनाच केली असून आपोआप वयाची पूर्तता झाल्यानंतर महिला यातून वगळले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

थायलंडच्या हल्ल्यानं कंबोडियाचा संताप,राष्ट्रपती म्हणतात एका कॉलवर युद्ध थांबवणार

Maharashtra Live News Update: निलेश घायवळ हजर झाला नाही तर त्याची सर्व मालमत्ता जप्त करणार- पोलिसांचा इशारा

Weight loss diabetes medicine: वजन कमी करणारं औषध आलं, डायबेटीसही कंट्रोलमध्ये राहणार, भारतात किंमत किती?

Bride Useful Things: नव्या नवरीच्या कपाटात असायला हव्यात 'या' महत्वाच्या गोष्टी

Andheri-Bandra: अंधेरी ते वांद्रे १५ डब्ब्यांची लोकल धावणार; कधीपासून होणार सुरु?

SCROLL FOR NEXT