Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट! १ कोटी महिलांना मिळणार नाही ₹१५००? कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana 1 Crore Women Will not Get Benefit: लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख १८ नोव्हेंबर आहे. दरम्यान, अजूनही योजनेतील १ कोटींपेक्षा जास्त महिलंचे केवायसी बाकी आहे.
Published on
Summary

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेत केवायसीसाठी शेवटचा १ दिवस

१ कोटी १० लाख महिलांचे केवायसी बाकी

१ कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद होणार

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. दरम्यान, आतापर्यंत जवळपास १ कोटी १० लाख महिलांचे केवायसी बाकी आहे. केवायसी करण्यासाठी उद्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाहीये. दरम्यान, अजून १ कोटी महिलांचे केवायसी बाकी आहे त्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार का अशी भीती लाभार्थी महिलांच्या मनात निर्माण झाली आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फक्त ६ दिवस! लाडक्या बहिणींनो मुदतीपूर्वी KYC करा, कोणती कागदपत्रे आवश्यक, स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेला दीड वर्ष पूर्ण झाले आहे. सुमारे अडीच कोटी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे. केवायसी करण्यासाठी १८ नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे केवायसी करुन घेण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

केवायसीसाठी मुदतवाढ देणार का? (Ladki Bahin Yojana kyc deadline extension)

आता केवायसी पूर्ण करण्यासाठी शेवटचे काही तास उरले आहे. यामध्ये १ कोटी महिलांचे केवायसी होणे अशक्य आहे. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, आता याबाबत काय निर्णय होणार हे पाहणे गरजेचे आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या eKYC साठी मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती समोर

लाडकी बहीण योजनेत दर दिवशी ५ लाख महिलांची केवयासी

लाडकी बहीण योजनेत दररोज लाख महिलांची केवायसी होत असल्याची माहिती स्वतः मंत्री आदिती तटकरेंनी दिली होती. त्यानंतर आतापर्यंत १ कोटींपेक्षा जास्त महिलांचे केवायसी पूर्ण झाले आहेत. त्यानंतर अजूनही कोट्यवधी महिलांचे केवायसी बाकी आहेत. त्यामुळे जर या महिलांनी केवायसी केले नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: उरले २४ तास! लाडक्या बहिणींनो eKYC करायची विसरलात? स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com