Siddhi Hande
लाडकी बहीण योजनेत केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसीसाठी १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.
राज्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना उद्यापर्यंत केवायसी पूर्ण करायची आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा लाभ बंद केला जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी सर्वात आधी ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला स्क्रिनवर ई केवायसी असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. आधारशी लिंक मोबाईल नंबरवर ओटीपी येईल. तो टाकायचा आहे.
यानंतर जर तुमची केवायसी पूर्ण झाली असेल तर तसा मेसेज दिसेल. जर बाकी असेल तर पुढची प्रोसेस सुरु होईल.
यानंतर तुम्हाला तुमचे पती किंवा वडिलांचा आधार आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. तो ओटीपी तुम्ही टाका.
यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्याची उत्तरे द्या. यानंतर डिक्लेरेशन फॉर्मवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल. यानंतर तुमची प्रोसेस पूर्ण होईल.