Leopard Facts: बिबट्या किती वर्षे जगतो?

Sakshi Sunil Jadhav

जंगली प्राणी

बिबट्या हा भारतातील सर्वात चपळ आणि हुशार शिकारी प्राण्यांपैकी एक मानला जातो. जंगलांपासून मानवी वस्तीतही सहज दिसणारा हा प्राणी आयुष्य, वास्तव्य आणि त्याच्या वर्तनाबद्दल अनेक गोष्टी समोर येतात.

Leopard Facts

तज्ज्ञांनी दिलेली माहिती

तज्ज्ञांच्या माहितीनुसार बिबट्यांचे जगणे, त्यांचे प्रकार आणि राहण्याच्या पद्धती प्रदेशानुसार वेगळ्या दिसतात. पुढे आपण त्याबद्दल जाणून घेऊ.

how long leopards live

बिबट्याचे आयुष्य

बिबट्या साधारण 12 ते 17 वर्षे जगतो. कैदेत हा कालावधी 20 वर्षांपर्यंत वाढू शकतो.

leopard types

वैज्ञानिक नाव

Panthera pardus हे बिबट्याचे वैज्ञानिक नाव आहे. महाराष्ट्रात याला बिबट्याच म्हणतात.

captive leopard age

बिबट्याचे प्रकार

आफ्रिकन बिबट्या, भारतीय एशियन बिबट्या, अरबी बिबट्या, श्रीलंकन बिबट्या, फार ईस्टर्न अमूर बिबट्या असे प्रमुख प्रकार जगभर आढळतात.

captive leopard age

भारतामध्ये वास्तव्य

भारतातील जवळपास 18 राज्यांमध्ये बिबट्यांची उपस्थिती नोंदवली गेली आहे. जंगल, डोंगराळ भाग, दऱ्या आणि शेतीजवळील क्षेत्रे त्यांची मुख्य ठिकाणे आहेत.

captive leopard age

जास्त बिबट्यांची संख्या कुठे?

महाराष्ट्र, उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान या राज्यांमध्ये बिबट्यांची सर्वाधिक संख्या आढळते.

captive leopard age

मुख्य आहार

हरीण, ससे, रानडुकरं, माकडं तसेच कधी कधी कुक्कुटपालनातील प्राणी त्याचा आहार असतो.

captive leopard age

कोणाला घाबरतो?

प्रौढ बिबट्या साधारणतः वाघ, सिंह, मोठे कळप असलेले वन्यकुत्रे, तसेच मोठ्या आवाजाला घाबरतो. माणसांपासून तो शक्य तितका दूर राहण्याचा प्रयत्न करतो.

captive leopard age

संख्या आणि धोका

बिबट्या प्रामुख्याने रात्री सक्रिय असतो, त्यामुळे तो मानवी नजरेत कमी पडतो. अधिवास नष्ट होणे, विकास प्रकल्प, पाणी-अन्नाची कमतरता आणि मानवी संघर्ष हे बिबट्यांच्या अस्तित्वासाठी मोठे धोके मानले जातात.

captive leopard age

NEXT: वरण भात खाऊन कंटाळलात? मग ही खोबऱ्याची चटपटीत चटणी करून पाहाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Chutney Recipe
येथे क्लिक करा