Sakshi Sunil Jadhav
घरगुती स्वयंपाकात खोबऱ्याची चटणी ही एक अशी पारंपरिक चव आहे, जी वरण-भात, भाकरी किंवा पिठलासोबत अप्रतिम लागते. कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चव हा या चटणीचा खासपणा. खाली दिलेल्या पद्धतीने ही चटणी करून पाहा.
कढई गरम करून त्यात जिरे टाकावीत आणि मंद आचेवर हलकेसे भाजून घ्यावेत.
जिरे काढल्यानंतर कढईत खोबऱ्याचे काप टाकून थोडेसे सोनेरी होईपर्यंत भाजावेत.
खोबरे काढल्यानंतर त्याच कढईत लसूण ठीकठाक भाजून घ्या.
भाजलेले खोबरे, जिरे, लसूण हे थंड होऊ द्या. गरम साहित्य मिक्सरमध्ये टाकू नये.
थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घाला. चवीनुसार लाल तिखट आणि मीठ घालून चटणी फिरवा.
काही जण अर्धा चमचा तेल घालतात, त्यामुळे चटणी ओलसर आणि मऊ लागते. मिश्रण अगदी बारीक वाटून चटणी तयार करा.
साधे वरण-भात, पिठलं-भाकरी किंवा डाळ-भातासोबतही ही चटणी अप्रतिम लागते.