Sakshi Sunil Jadhav
हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना आणि त्यात येणारी अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते. ही तिथी पितरांना समर्पित असून भगवान शिवाच्या पूजेला विशेष महत्व आहे.
श्रद्धेनुसार या दिवशी पूजा, जप आणि दान केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात. विशेषतः शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्यास शुभ फळ मिळतं, असा धार्मिक विश्वास आहे.
अमावस्येच्या दिवशी शिवलिंगावर काले तिळ मिसळून पाणी अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे पितृदोष शांत होतो आणि जीवनातील अडचणी कमी होतात, अशी मान्यता आहे.
उसाचा रस उपलब्ध असल्यास त्याने अभिषेक करावा. नसेल तर पाण्यात गुळ मिसळून अर्पण करावे. यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन धनप्राप्तीचे मार्ग खुलतात.
या दिवशी शिवलिंगावर आकाची फुले अर्पण केल्याने भगवान शिवाची विशेष कृपा प्राप्त होते. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी हे अत्यंत लाभदायक मानले जाते.
शमीची पाने शिवलिंगावर अर्पित केल्याने शनीची साडेसाती, कर्ज किंवा इतर अशुभ ग्रहांचा परिणाम कमी होतो. दुर्भाग्य दूर होऊन सौभाग्य प्राप्त होतं.
बेलपत्रावर ‘ॐ’ किंवा ‘राम’ लिहून शिवलिंगावर १०८ बेलपत्र अर्पण करावीत. त्यानंतर पाणी किंवा अमृत अर्पण करणे शुभ मानले जाते. यामुळे इच्छापूर्ती होते आणि नातेसंबंधातील गोडवा वाढतो.