Chanakya Niti: तुमच्या चांगुलपणाचा फायदा तर घेत नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली माणसं ओळखण्याची ट्रिक

Sakshi Sunil Jadhav

आचार्य चाणक्य

चाणक्य नितीमध्ये मानवी स्वभाव, नाती आणि व्यवहार याबद्दल अनेक उपयुक्त शिकवण दिली आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत अनेकदा काही लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात.

human psychology tips | saam tv

चाणक्य निती

आपण चांगले असल्यामुळे त्यांना मदत करतो, वेळ देतो, त्यांच्यासाठी प्रयत्न करतो; पण बदल्यात तेच लोक आपल्याला फसवू शकतात. अशावेळी चाणक्यांची निती सांगते की माणसांना ओळखण्याची काही सोपी चिन्हं लक्षात ठेवली, तर आपण स्वतःचे नुकसान टाळू शकतो.

human psychology tips

स्वार्थासाठी जवळ येणारे लोक

जे लोक फक्त त्यांच्या कामासाठी तुम्हाला संपर्क करतात, पण तुमचं काही काम असेल तर दूर राहतात असे लोक चांगुलपणाचा फायदा घेतात.

identify selfish people

तुमच्या वेळेची किंमत न करणारे

नेहमी तुमच्याकडून मदत मागणारे पण कधीही तुमचा आदर न करणारे लोक खरे मित्र नसतात.

identify selfish people

पाठीमागून वाईट बोलणारे

समोर गोड बोलून मागे बदनामी करणारे लोकांपासून सावध राहा. चाणक्य म्हणतात अशा लोकांपासून जितके दूर राहाल तितके चांगले.

Chanakya Niti

तुमच्या यशात आनंद न मानणारे

तुम्ही यशस्वी झालात की ज्यांना चिडचिड होते किंवा तुलना करत तुम्हाला कमी दाखवतात ते खरे समर्थक नसतात.

Chanakya Niti

चुका दाखवून अपमान करणारे

रचनात्मक सल्ला देणे वेगळे आणि कोणत्याही प्रसंगी तुम्हाला लहान दाखवणे वेगळे. असे लोक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेतात.

Chanakya Niti

कधीही शब्दाला उतरू न शकणारे

वारंवार आश्वासन देऊनही ते पाळत नाहीत. चाणक्य म्हणतात, ज्यांचा शब्द पक्का नाही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका.

Chanakya Niti

फक्त आपल्या फायद्याचा विचार

जे लोक नेहमी निर्णय घेताना स्वतःच्या फायद्याचा विचार करतात आणि तुमच्या अडचणींकडे दुर्लक्ष करतात ते स्वार्थी असतात.

Chanakya Niti

तुमच्या मर्यादा ओलांडणारे

तुमच्या भावना, वेळ, पैसा किंवा मेहनतीचा शोषण करणाऱ्या लोकांपासून त्वरित अंतर ठेवणेच योग्य आहे.

Chanakya Niti

NEXT: चहासोबत रोज कांदे पोहे कशाला? थंडीत करा गरमागरम पालक भजीचा बेत, नोट करा रेसिपी

Palak Bhaji Recipe | saam tv
येथे क्लिक करा