Sakshi Sunil Jadhav
थंडीची चाहूल लागली की गरमागरम खमंग भाज्यांची आठवण आपोआप येते. अनेक घरांत चहासोबत रोजचेच कांदे पोहे किंवा बिस्किटांचा ताट होता. पौष्टिक, कुरकुरीत आणि पटकन तयार होणाऱ्या या भजीला मुलांसह मोठेही पसंती देतात. चला तर मग जाणून घ्या सोपी आणि घरच्या घरी बनवण्यासारखी पालक भजी रेसिपी.
भजीसाठी नेहमी ताज्या, हिरव्या, डाग नसलेल्या पालकाची निवड करा. त्याने चव आणि गुणवत्ता चांगल्या प्रमाणात मिळते.
पानांवर धूळ किंवा माती राहू नये म्हणून पालक 2–3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवा.
भजी चांगली बांधली जावी म्हणून पालक बारीक चिरून घ्या.
चिरलेला पालक, बेसन, हिरव्या मिरच्या, हळद, तिखट, ओवा, मीठ आणि थोडेसे आले–लसूण पेस्ट मिसळा.
पालकात आधीच ओल असते. त्यामुळे भजीचे पीठ घट्ट राहील इतपतच पाणी घाला.
भजी कुरकुरीत यावी तर तेल मध्यम हाय तापमानावर व्यवस्थित तापलेले असावे.
एकावेळी मोठ्या प्रमाणात तेलात भजी सोडू नका. तापमान खाली येऊन भजी तेलकट होते.
भजी दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत दिसेपर्यंत तळा. तळल्यानंतर भजी लगेच पेपर टॉवेलवर ठेवून चहा, सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.