Sakshi Sunil Jadhav
पालकाची पुरी चविष्ट असली तरी अनेकदा त्या तेलकट होतात, फुलत नाहीत किंवा मऊच राहतात. योग्य पद्धत आणि काही सोप्या टिप्स वापरल्या तर या समस्या सहज दूर होतात.
घरच्या घरी कडक, हिरव्या आणि नॉन-ऑइली पालक पुऱ्या बनवण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा. वाचा सोप्या टिप्स.
पालक 1 मिनिट उकळत्या पाण्यात टाकून लगेच थंड पाण्यात काढा. यामुळे रंग छान राहतो आणि पिठात ओल कमी जाते.
खूप पातळ पालक पुरी केली तर पीठ मऊ होऊन पुरी तेलकट होते. जाडसर पुरी उत्तम.
पालकाची पुरीचं पिठाला पुरेसं ओल देईल. पाणी टाळलं तर पुरी तेल शोषत नाही.
पुरीचे पीठ चपातीसारखे मऊ नसावे. थोडे कडक पीठ केले की पुरी टम्म फुलते.
मध्यम-हाय तापमानावर पुरी टाकली की ती लगेच फुगते आणि तेलकट होत नाही.
जास्त पुरी टाकल्यास तेलाचे तापमान कमी होते आणि पुरी जास्त तेल शोषते.
जास्त वेळ तळल्यास पुरी मऊ पडते आणि रंगही खराब होतो. दोन्ही बाजू 20–25 सेकंद पुरेसे. तळलेली पुरी लगेच पेपर टॉवेलवर ठेवा. अतिरिक्त तेल शोषलं जातं. थोडा विश्रांती दिल्यास पीठ सेट होतं आणि पुरी जास्त छान फुलते.