Ladki Bahin Yojana Special Report Saam Tv
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी झाली दोडकी? लाभ नाही सोडला तर पैसे भरावे लागणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Ladki Bahin Yojana Updates : नियमात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावेत असे सरकारने म्हटले आहे. असे न केल्यास पैशांची वसुली केली जाईल असे संकेतही देण्यात आले आहेत.

Yash Shirke

विनोद पाटील, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! नियम डावलून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींनी लाभ न सोडल्यास सर्व पैशांची वसुली करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे लाभ सोडण्यासाठी नवी व्यवस्था निर्माण केली जाणार आहे. लाडक्या बहिणींची नावं कशी वगळली जाणार? नाव न वगळल्यास कसे पैसे वसूल करणार? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

नियमात बसत नसलेल्या लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घ्यावेत अन्यथा दंडासहित पैसे वसुलीचे संकेत सरकारनं दिलेत. त्यामुळे लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. नियमाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ सोडण्यासाठी सरकारकडून आवाहन करण्यात येणार आहे. तर लाभ सोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पोर्टल लॉगिन दिले जाणार आहे. त्यात जिल्हा पातळीवरच लाडक्या बहिणींची नावं वगळण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती समोर आलीय. मात्र हा अर्ज मागे कसा घ्यावा? पाहूयात.

लाभ सोडा नाहीतर पैसे भरा.

- लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज करावा.

- योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचं लिहून द्यावं लागणार.

- जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनवरून अर्जातील नावं वगळण्याची प्रक्रिया होणार.

- स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज लॉगिन वरून वगळण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना.

- पुणे आणि धुळे जिल्ह्यात यापूर्वीच 2 लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतला आहे.

केंद्र सरकारच्या गॅस सिलिंडरवरील सबसिडी सोडण्याबाबतच्या गिव इट अप योजनेप्रमाणे लाडक्या बहिणींनाही योजनेचा लाभ सोडण्याचं आवाहन केलं जाणार आहे. एवढंच नाही तर ज्या लाडक्या बहिणी नियमाबाहेर लाभ घेत आहेत त्यांनी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याकडून वसुली केली जाण्याची शक्यता आहे... त्यामुळे राज्यभरातील 2 कोटी 63 लाख लाडक्या बहिणींपैकी किती लाडक्या बहिणींचा पत्ता कापला जाणार? याबरोबरच आतापर्यंत 6 महिने नियमाबाहेर लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणींबाबत सरकार काय निर्णय घेणार? याकडे लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री थरार, जत्रेत जायंट व्हीलमध्ये १८ जण अडकले, ५ तास आकाशात मृत्यूशी झुंज| VIDEO

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येणार; कारण काय? वाचा

Famous Singer : प्रसिद्ध गायिकेचा छळ; विरोध करणाऱ्या भावाला झाडाला बांधले अन् बेदम मारहाण

IND vs AUS playing 11 : अर्शदीपला बाहेरचा रस्ता, कुलदीपची एन्ट्री; शुभमनची सैना क्लीन स्वीप टाळणार का?

SCROLL FOR NEXT