Pune Traffic Changes : पुण्यातील वाहतुकीत बदल; पर्यायी रस्ते कोणते, प्रवास कसा कराल? जाणून घ्या

Pune Traffic Changes Status : मेट्रोचे बांधकाम सुरु असताना वाहतूक सुरळीत सुरु राहावी यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाने शहरातील वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
Pune Traffic Changes
Pune Traffic ChangesSaam Tv
Published On

Pune Traffic Changes Updates : पुण्यातील गणेशखिंड रोडवरील पुणे विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान टाटा मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोचे बांधकाम सुरु असताना तेथील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीतपणे सुरु राहावी यासाठी वाहतूकीत तात्पुरत्या स्वरुपाचे बदल करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त अमोल झेंडे यांनी जारी केले आहेत.

वाहतूक शाखेच्या आदेशांनुसार -

१. बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक - बाणेरकडून येणारी वाहतूक औध रोडवर वळवून राजभवन समोरील पंक्चरमधून यू-टर्न घेवून पुन्हा विद्यापीठ मार्गे शिवाजीनगरला इच्छितस्थळी जातील.

२. शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक - शिवाजीनगरकडून औंधकडे जाणारी वाहतूक ही पुणे विद्यापीठ चौकातून सरळ औंध रोड मार्गे इच्छितस्थळी जातीला.

३. औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक - औंधकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक ही मिलेनियम गेट चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनच्या गेटमधून पुणे विद्यापीठ परिसर-उजवीकडे वळून-वाय जंक्शन-विद्यापीठ मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडून इच्छितस्थळी जातील.

Pune Traffic Changes
Shubhada Kodare Case : शुभदा कोदारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे शहर वाहतूक शाखेने नागरिकांना बदलांची माहिती दिली आहे. एका बाजूला मेट्रोचे काम सुरु असताना दुसऱ्या बाजूला वाहतूक सुकर आणि सुरळित राहावी यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वाहतूक बदल मार्गाचा वापर करुन वाहतूक शाखेचे कर्मचारी, स्वयंसेवक यांना सहकार्य करावे असे आवाहन अमोल झेंडे यांनी केले आहे.

Pune Traffic Changes
Walmik Karad Health: वाल्मिक कराडची तब्येत बिघडली; सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दुपारीच लावला होता मकोका!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com