Shubhada Kodare Case : शुभदा कोदारे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, राष्ट्रीय महिला आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

Shubhada Kodare Case Updates : पुणे शहरातील शुभदा कोदारे या तरुणीची हत्या करण्यात आली होती. या गंभीर प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेत घटनेचा तपास करायला सुरुवात केली आहे.
Shubhada Kodare Case Updates
Shubhada Kodare Case Updates Saam Tv
Published On

Subhada Kodare Case Status : पुणे शहरात आयटी कंपनीमध्ये काम करणारी शुभदा कोदारे या तरुणीचा खून करण्यात आला होता. शुभदाच्या ऑफिसमधील सहकाऱ्याने आर्थिक वादातून तिच्यावर चॉपरने हल्ला केला होता. या प्रकरणी आरोपी कृष्णा कनोजाला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुभदा कोदारे हत्या प्रकरणाबद्दल नवी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची समिती उद्या (१५ जानेवारी) पुण्यात दाखल होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली. या प्रकरणासाठी आयोगाकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून फॅक्ट फायंडिंग कमिटी (घटनेतील तथ्य शोधणारी समिती) संपूर्ण प्रकरणाचा तपास करणार आहे.

दरम्यान आयोगाची समिती पुण्यात दाखल झाल्यानंतर सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीला राष्ट्रीय महिला आयोगाच्या समितीतील सर्व प्रमुख अधिकारी, पुणे जिल्हाधिकारी. अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त उपस्थित राहणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच डब्लूएनएस कंपनीचे संचालक आणि सुरक्षा अधिकारी यांनाही बैठकीला हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

Shubhada Kodare Case Updates
Taloja MIDC Accident : २ पावलांवर मृत्यू बघितला, स्वतःला वाचवणार; तोच सुस्साट कारनं उडवलं, भीषण अपघाताचा CCTV

पुढील १० दिवसांमध्ये विशेष समितीकडून हत्या प्रकरणाचा अहवाल देण्याचे निर्देश महिला आयोगाने दिले आहेत. आयोगाच्या समितीमध्ये केरळच्या माजी पोलीस महासंचालक आर. श्रीलेखा, हरियाणाच्या माजी पोलीस महासंचालक डॉ. बी. के. सिन्हा आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या सचिव मीनाक्षी नेगी यांचा सहभाग आहे. समितीच्या तपासामुळे या हत्या प्रकरणाला वेग येणार असल्याचे म्हटले जात आहे.

Shubhada Kodare Case Updates
Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडला मकोका, १४ दिवसांची कोठडी; कोर्टात काय काय झालं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com