A newly constructed cable-stayed bridge connecting Konkan and Western Maharashtra, set to reduce travel distance and boost regional connectivity. saam tv
महाराष्ट्र

कोकण-पश्चिम महाराष्ट्र आणखी जवळ येणार! नव्या पुलामुळे अंतर ५० किमीने कमी होणार; मार्ग कसा असणार?

New Bridge Between Khed And Mahabaleshwar Distance Reduced: कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा 175 कोटींचा केबल स्टेड पूल पूर्ण झाला असून खेड ते महाबळेश्वर अंतर 50 किमीने कमी होणार आहे.

Omkar Sonawane

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर आता 50 किलोमीटरने कमी होणार आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यानंतर हा पूल लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच या पुलाच्या कामाची पाहणी केली.

तब्बल 175 कोटी रुपये खर्च करून मुंबईतील वरळी सागरी सेतुप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा केबल स्टेड पूल प्रथमच उभारला जात आहे. तापोळा ते कोकणच्या दिशेला गाढवली असा हा पूल बांधण्यात आला आहे. 540 मीटर लांब आणि 14 मीटर रुंद असलेल्या या पुलाच्या मध्यभागी 43 मीटर उंचीची व्ह्यू गॅलरी देखील उभारली आहे. या गॅलरीमध्ये जाण्यासाठी कॅप्सुल लिफ्टची सुविधा असेल. तसेच दोन्ही बाजूनी जिन्याचे मार्गही असतील. या प्रकल्पाचे काम टी अँड टी या कंपनीकडे देण्यात आले आहे.

शिवसेना-भाजप युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना या पुलाचे काम प्रस्तावित होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामाला गती दिली. पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनाळी घाट मार्ग वाचणार आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाट मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे.

300 कोटींचा आणखी पूल

एकनाथ शिंदे यांचे गाव असलेले सातारा जिल्ह्यातील दरे हे गाव कोयना खोऱ्यातील बामणोली गाव यांना जोडणारा आणखी एक 300 कोटी रुपये खर्च करून पूल उभारण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, खांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणारा कोयना बॅकवॉटरमधील बार्जचा प्रवासही या पुलामुळे टाळता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उन्हाळ्यात 'कच्चा कांदा' का खातात? आरोग्याला काय होतो फायदा?

Maharashtra News Live Update : अंबरनाथचे 'ते' १२ नगरसेवक भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला!

High blood pressure: तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय उच्च रक्तदाब, डॉक्टरांनी दिला धोकादायक ‘सायलेंट किलर’चा इशारा

Maharashtra Politics: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना बालेकिल्ल्यातच एकनाथ शिंदेंकडून मोठा झटका, बड्या नेत्याने ५०० कार्यकर्त्यांसह सोडली साथ

Mango Rice Recipe : उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणाला बनवा आंबट-गोड 'मँगो राईस', खमंग वासानेच भूक दुप्पट लागेल

SCROLL FOR NEXT