Alphonso Mango Saam Tv
महाराष्ट्र

Alphonso Mango: हापूस आंब्यावर गुजरातचा दावा, कोकणातील शेतकरी कोर्टात जाण्याच्या तयारीत

Hapus Amba: कोकणच्या देवगड आणि रत्नागिरी हापूस आंबा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण हापूस आंब्यावर गुजरातने दावा केला आहे. गुजरातने वलसाड हापूससाठी भौगोलिक मानांकन मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत.

Priya More

Summary -

  • गुजरातने हापूस आंब्यावर दावा केला आहे

  • वलसाड हापूससाठी भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न

  • कोकण हापूसची ओळख धोक्यात येईल अशी शेतकऱ्यांना भीती

  • देवगड–रत्नागिरी हापूसला आधीच 2018 मध्ये मिळाले भौगोलिक मानांकन

अमोल कलये, विनायक वंजारी, साम टीव्ही

जगभरात कोकणच्या देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याला मोठी मागणी आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांना याच हापूस आब्यांने आर्थिक सुबत्ता मिळवून दिली आहे. मात्र आता गुजरात राज्यातील गांधीनगर आणि नवसारी विद्यापीठाने २०२३ मध्ये वलसाड हापूस नावाने भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे कोकणातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशाप्रकारे जर कोकण हापूसची ओळख पुसण्याचा प्रयत्न झाल्यास हे सहन करणार नसल्याचा इशारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी दिला आहे.

कोकणच्या हापूस आंब्यासमोर आता गुजरातच्या वलसाड हापूसचे आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. गुजरातने वलसाड हापूससाठी भौगोलिक मानांकन मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. गांधीनगर आणि नवसारी कृषी विद्यापीठाने यासाठी पुढाकार घेतला असून या मागणीमुळे कोकणातील आंबा बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत.

कोकण हापूसला २०१८ मध्ये भौगोलिक मानांकन मिळाले होते. ज्यामुळे त्याला जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख मिळाली. मात्र आता वलसाड हापूसलाही हे मानांकन मिळाल्यास कोकणच्या हापूसची ओळख पुसली जाण्याची आणि दरांवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. या अहवालात गुजरातच्या दाव्याची आणि कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

हापूस ही कोकणची ओळख आहे यासाठी सर्व नियम अटी पाळून कागदपत्र सादर केली आहेत. २००८ ते २०१८ पर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली हापूस हा कोकणातील ओरिजनल आहे हे सिद्ध करावे लागले. त्याच वेळेला भौगोलिक मानांकन हापूस मिळाले जर हे मानांकन अन्य कोणाला मिळाल्यास वेळ पडल्यास सर्व न्यायालय लढाई आम्ही लढू शिवाय सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा आम्हाला पाठिंबा असेल याची आम्हाला खात्री आहे अशी प्रतिक्रिया कोकण हापूस उत्पादक आणि विक्रेते संघाचे अध्यक्ष डॉ विवेक भिडे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BH नंबर प्लेटचं जाळं वाढतंय; पण पुण्यात प्रतिसाद कसा आहे? आकडेवारीसह अहवाल समोर

Maharashtra News Live Update: भोंदू राजेंद्र गडगे याला घेऊन पोलिस पोहचले दत्तधाम आश्रमात...

Crime News: बलात्कार केला, प्रायव्हेट पार्टमध्ये लाल मिर्ची टाकली; पत्नी थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली

Dharashiv Crime: जमिनीच्या वादानं आणलं भावकीत वैर; चुलत्यानं २१ वर्षीय पुतण्याला संपवलं

Fatty Liver Detox: काय सांगता? दारु न पिताही लिव्हर होतो खराब, 'या' ७ घातक सवयी कारणीभूत ठरतात

SCROLL FOR NEXT