Shreya Maskar
आंबा हा फळांचा राजा आहे. हापूस आंब्याला 'अल्फान्सो' म्हटले जाते.
चवदार हापूस आंबा रत्नागिरीत पिकतो. 'हापूस' नावामागे अनेक कथा आहेत.
'अल्फोन्सो डी अल्बुकर्क' या पोर्तुगीज अधिकाऱ्याच्या नावावरून 'अल्फान्सो' असे आंब्याचे नाव पडले आहे.
तेथील स्थानिक लोक त्याला 'अफ़ूस' म्हणू लागले, ज्याचे रूपांतर पुढे 'हापूस' मध्ये झाले.
पोर्तुगीज लष्करात 'अल्फोन्सो डी अल्बुकर्क' नावाचे एक अधिकारी होते.
पोर्तुगीजांचे राज्य उभारण्यात 'अल्फोन्सो डी अल्बुकर्क' यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
'अल्फोन्सो डी अल्बुकर्क' यांनी गोव्यात वास्तव्य केले तेव्हा तेथील आंब्याच्या जातीवर अनेक प्रयोग करून हा आंबा पिकवला.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.