Shreya Maskar
आंब्याच्या सीजनमध्ये आवर्जून आंब्याचा रायता बनवा.
आंब्याचा रायता खाल्ल्यामुळे पोटाला थंडावा मिळेल.
आंब्याचा रायता बनवण्यासाठी लाल सुक्या मिरच्या, मोहरी, मीठ, लाल तिखट, मीठ, हळद, आंबा, हिंग, गूळ आणि लसूण इत्यादी साहित्य लागते.
आंब्याचा रायता बनवण्यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये आंबा पाणी टाकून शिजवून घ्या.
पॅनमध्ये तेल गरम करून त्यात लाल सुक्या मिरच्या, मोहरी, हिंग आणि बारीक लसूण टाकून व्यवस्थित फोडणी द्या.
त्यानंतर मिश्रणात लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
शेवटी शिजवलेल्या आंब्यांचा रस या मिश्रणात टाकून एकजीव करा.
त्यानंतर वरून तुमच्या आवडीनुसार गूळ टाकून मिक्स करा.
आंबट-गोड आंब्याचा रायता गरमागरम भातासोबत आस्वाद घ्या.