Shreya Maskar
मोतीचूर लाडू बनवण्यासाठी बेसन, तूप, बेकिंग सोडा, वेलची, साखर आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
मोतीचूर लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन, केशर चांगले मिक्स करा.
त्यानंतर या मिश्रणात पाणी आणि बेकिंग सोडा घालून एकजीव करा.
आता पॅनमध्ये तूप गरम करून बुंदीचे पीठ हळूहळू तेलात पाडा.
दुसरीकडे एका पॅनमध्ये थोडे पाणी आणि साखर घालून पाक तयार करा.
आता मिश्रणात बुंदी घालून चांगले शिजवून घ्या.
शेवटी यात वेलची पूड टाकून गॅस बंद करा.
हाताला तूप लावून मोतीचूर लाडू छान वळून घ्या.