Shreya Maskar
बटर नान बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मैदा, बटर, साखर, यीस्ट, दही, मीठ, कलौंजी आणि पाणी इत्यादी साहित्य लागते.
बटर नान बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये यीस्ट, साखर आणि पाणी एकत्र करून घ्या.
या मिश्रणात मैदा किंवा गव्हाचे पीठ मिक्स करून ४०-४५ मिनिट झाकून ठेवा.
शेवटी या पिठात मीठ, बटर आणि दही घालून मऊ मळून घ्या.
पिठाचे गोळे मैदामध्ये डस्ट करुन त्यावर कलौंजी शिंपडा.
नंतर पिठाच्या गोळ्याला नानचा आकार द्या.
आता पॅनमध्ये तूप टाकून नान दोन्ही बाजूनी गोल्डन फ्राय करून घ्या.
गरमागरम भाजीसोबत बटर नानचा आस्वाद घ्या.