Shreya Maskar
सुशी हा जपानी खाद्यपदार्थ आहे.
सुशी बनवण्यासाठी जास्मिन राइस, व्हिनेगर, साखर, मीठ, भाज्या आणि सोया सॉस इत्यादी साहित्य लागते.
सुशी बनवण्यासाठी सर्वप्रथम जास्मिन राइस शिजवून घ्या.
भात थंड झाल्यावर त्यात व्हिनेगर, साखर आणि मीठ घालून मिक्स करा.
या मिश्रणात चिरलेल्या भाज्या मिक्स करून टाका.
सुशी रोल करण्यासाठी बाजारात मिळणारी सुशी शीट वापरा त्यावर राइसचे मिश्रण पसरवा.
आता हे मिश्रण दाबून सुशी शीट रोल करा.
शेवटी सोया सॉससोबत सुशीचा आस्वाद घ्या.