युद्धाचा भडका, शेतकऱ्यांना फटका; आखाती देशांमध्ये निर्यात महागली, VIDEO

us-israel vs iran war : आखाती युद्धाची झळ आता महाराष्ट्रातल्या शेतक-यांना बसतेय. निर्यात ठप्प झाल्याने कांदा, केळी, द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका फटका बसलाय. निर्यातदारांचं कसं गणित बघिडलंय ?यावरचा एक खास रिपोर्ट पाहूया...
war effect
us-israel vs iran war Saam tv
Published On

मध्य-पूर्वेतील युद्ध सुरू होऊन अवघे पाच दिवस होत नाहीयेत तर त्याचे परिणाम आत्ताच जाणवू लागलेत. आखाती देशांमध्ये भारतीय मालाच्या निर्यातीवर अतिरिक्त खर्च करावा लागतोय आणि त्याचा थेट फटका बळीराजाला बसायला लागलाय.वाहतूक ठप्प झाल्यानं निर्यातक्षम माल कंटेनरमध्ये पडून आहे.

सांगलीत द्राक्ष उत्पादक संकटात सापडलेत कारण मुंबईच्या बंदरात 300 कंटेनर उभे आहेत. सांगलीच्या कोल्ड स्टोअरेज मध्ये 350 कंटेनर द्राक्ष पडून आहेत. 700 हुन अधिक कंटेनर भरतील एवढी द्राक्ष बागेत आहेत. जवळपास 15 हजार टन इतक्या द्राक्षांची आखाती देशातील निर्यात ठप्प आहे. यात सुमारे 200 कोटी रुपयांचे नुकसान झालय. सोलापूर जिल्ह्यातही रशिया युरोपला निर्यात 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत.

war effect
Iran vs Israel America War : इराण होणार बेचिराख? अमेरिकेनं उघडला तिसरा डोळा, VIDEO

२ जळगाव जिल्ह्यातले 100 पेक्षा अधिक केळीचे कंटेनर JNPT मध्ये अडकले आहेत. रमजान महिन्यांमध्ये दररोज 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशांमध्ये निर्यात होतात. मात्र युद्धामुळे निर्यात ठप्प झाली आहे. 16 हजार टन कांदा 150 कंटेनरमध्ये अडकून पडला आहे. या कांद्याची किंमत 40 ते 50 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

याशिवाय बासमती तांदूळ निर्यातीलाही मोठा फटका बसलाय. अंदाजे 4 लाख मेट्रिक टन बासमती तांदूळ भारतीय बंदरांवर अडकून पडलाय. जगातील सर्वात मोठा बासमती तांदूळाचा निर्यातदार असलेला भारत मध्य पूर्वेतील देशांना मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो. युद्धामुळे इराणसोबतचा व्यापार पूर्णपणे थांबला आहे.

war effect
Famous Actor Death : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; कुटुंब बुडाले शोकसागरात

एवढंच नव्हे तर चहा, फळे यांसारख्या इतर वस्तूंच्या निर्यातींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.त्यातच कांदा आणि इतर सामान वाहतुकीसाठी वाहतूकदारांकडून 3 मार्चपासून इमर्जन्सी सरचार्ज लागू केला आहे. त्यामुळेच आधीच आस्मानी संकटांनी त्रस्त झालेला शेतकरी या युद्धामुळे अधिकच हतबल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com