Suraj Chavan : हापूस आंब्यांची मेजवानी अन् दाजींना केली खास विनंती; सूरज पोहचला अंकिता ताईच्या घरी, पाहा video

Ankita Walawalkar- Suraj Chavan : नुकताच सूरज चव्हाण अंकिता वालावलकरच्या घरी पोहचला आहे. त्यांनी एकत्र तुफान मजा केली आहे. याचा खास व्हिडीओ पाहाच.
Ankita Walawalkar- Suraj Chavan
Suraj ChavanSAAM TV
Published On

सध्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. त्याचा 'झापुक झुपूक' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी सूरज बिग बॉसमधील काही सदस्यांची भेट घेत आहे. नुकताच तो 'बिग बॉस मराठी 5' चा उपविजेता अभिजीत सावंत, बिग बॉसची सदस्या वर्षा उसगांवकर यांना भेटला आणि आता तो कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरला (Ankita Walawalkar) भेटला आहे. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सूरज चव्हाण थेट अंकिताच्या घरी पोहचला आहे. बिग बॉसच्या घरापासूनच अंकिता आणि सूरजची चांगली मैत्री पाहायला मिळाली होती. बिग बॉसच्या घराबाहेर देखील त्यांनी ही मैत्री खूप छान जपताना दिसत आहे. सूरजने अंकिताच्या घरी जाणून हापूस आब्यांची मेजवानी केली आहे. अंकिता आणि सूरज एकत्र एका ताटात आंबा खाताना दिसत आहे. अंकिता स्वतः आंब्याचे साल काढून सूरजला देत आहे.

सूरज अंकिताच्या नवऱ्याला म्हणजे त्याच्या दाजीला एक खास विनंती करताना दिसत आहे. सूरज कुणालला 'झापुक झुपूक' गाण्यावर भन्नाट डान्स करायला सांगत आहे. मात्र डान्ससाठी कुणाल नकार देताना पाहायला मिळत आहे. कुणाल सूरजला म्हणतो की, "तुझी अंकिता ताई डान्स करेल". यावरून सर्वच हसताना पाहायला मिळत आहे. आता सूरज-अंकिता आणि कुणालचा 'झापुक झुपूक' गाण्यावर डान्स पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

'झापुक झुपूक' चित्रपटातील गाण्यांसाठी कुणाल भगतने संगीत दिले आहे. सूरज सध्या आपल्या चित्रपटाचे प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. कुणाल-सूरज-अंकिता मस्त गप्पा मारताना व्हिडीओत दिसत आहे. सूरजच्या चित्रपटासाठी चाहते आतुर आहेत. 'झापुक झुपूक' चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Ankita Walawalkar- Suraj Chavan
Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी पोहचली शिर्डीला; सांगितलं साईबाबांसोबतच खास कनेक्शन, पाहा PHOTOS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com