dhananjay mahadik Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Politics: धनंजय महाडिकांना निवडणूक आयोगाचा दणका, 'त्या' आक्षेपार्ह विधानाप्रकरणी नोटीस

Dhananjay Mahadik: कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या फुलेवाडी येथील महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप येथे कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली होती.

Priya More

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूरचे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी निवडणूक विभागाकडून धनंजय महाडिक यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. धनंजय महाडिक यांनी करवीर येथील जाहीर सभेमध्ये लाडक्या बहिणींना धमकी दिली होती. 'लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत किंवा सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. आम्ही त्यांची व्यवस्था करतो.', असे वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केले होते. या वक्तव्याप्रकरणीच त्यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या फुलेवाडी येथील महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप येथे कोल्हापूर दक्षिणचे भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली होती. या जाहीर सभेत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता - २०२३ चे कलम १७९ अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तात्काळ सादर करण्यात यावा अशी नोटीस त्याच दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.

धनंजय महाडिक यांनी जाहीर प्रचारसभेमध्ये 'लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या आम्ही त्यांची व्यवस्था करतो.', असे वक्तव्य केले होते. धनंजय महाडिक यांनी या सभेमध्ये थेट लाडक्या बहिणींना धमकी दिली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्यावर सर्वस्तरावरून टीका देखील होऊ लागली होती. धनंजय महाडिक यांनी या वादानंतर माफी देखील मागितली. माझ्या वक्तव्याने कुठल्याही माता भगिनींचे मन दुखावले असेल तर मी त्यांची माफी मागतो, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : दिवसभरात कमीत कमी रिस्क घ्या; ५ राशींच्या नेत्यांनी काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत, अन्यथा...

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT