Kolhapur News Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur News: पाईपलाईन योजनेचे राजकारण काही थांबेना; तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये रंगली श्रेयवादाची लढाई

Kolhapur News: कोल्हापूरच्या या पाणी योजनेचा अधिकृत लोकार्पण सोहळा अद्याप बाकी आहे. मात्र त्याआधीच सत्कार सोहाळे होत असल्याने त्याचे राजकरण चांगलेच तापत आहे. योजनेवरुन दावे प्रतिदावे होत असले तरी कोल्हापूरकरांना मात्र या राजकारणापेक्षा स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळाल्याचा आनंद जास्त आहे.

Bharat Jadhav

(रणजीत माजगावकर)

Kolhapur Pipeline :

कोल्हापूर शहरासाठी बहुचर्चित असलेल्या थेट पाईपलाईन योजनेचे राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालीय. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील, शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ या तिघांनीही थेट पाईपलाईन आपल्याचमुळे झाल्याचा दावा केलाय. यामुळे पाईपलाईनमधून पाणी ऐवजी टीकेचे फवारे उडताना दिसत आहे.(Latest News)

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक परिसरात भव्य व्यासपीठ उभारून आणि हजारो नागरिकांच्या साक्षीने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा नागरी सत्कार राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते काल मोठ्या दिमाखात संपन्न झाला. दिवाळी दिवशीच काळमवाडी येथून थेट कोल्हापुरात थेट पाईपलाईनद्वारे या महत्वकांक्षी प्रकल्पातून पाणी आल्यानं कोल्हापूरकरांनी या योजनेचे श्रेय सतेज पाटील याना देत त्यांचा नागरी सत्कार केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणी देणारी थेट पाईपलाईन योजना अखेर ९ वर्षांनी पूर्ण झाली. या योजनेचे पाणी नागरिकांच्या नळाला जातो न जातो तोच या योजनेचा श्रेयवाद रंगला. गेल्या काही दिवसांपासून जलपूजनामुळे रंगलेले राजकारण आता वचनपूर्तीच्या कार्यक्रमामुळे पुन्हा तापले आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीच ही योजना पूर्ण केल्याचा दावा सर्वपक्षीय नेत्यांनी करत सतेज पाटील यांचा काल नागरी सत्कार केला.

यावेळी सतेज पाटील यांनी या योजनेला घेतलेले कष्ट आणि योजनेत खोडा घालणाऱ्या वृत्तीबद्दल जाहीर भाष्य केलं. पण काही झाले तरी या योजनेला मीच जबाबदार असणार हे कोल्हापूरकरांना माहीत असल्याच सांगत आपल्यामुळेच ही योजना पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी केला. तर शिंदे सेनेचे राजेश क्षीरसागर यांनी जोरदार हल्ला चढवलाय. ही योजना कोणा एकट्याची नसून ज्यांनी योगदान दिले त्यांचा सत्कार या कार्यक्रमात होण्याची अपेक्षा व्यक्त केली.

भास्करराव जाधव, हसन मुश्रीफ यांनीही या योजनेला हातभार लावला असून त्यांनाही डावलल्याचा आरोप त्यांनी केलाय.. शिवाय कोल्हापूरला पाणी मिळावे यासाठी ३५ वर्षे संघर्ष सूर होता. मात्र काँग्रेस पाणी देण्यास असमर्थ ठरली. त्यामुळे मी विधानपरिषदच्या पायऱ्यांवर उपोषण केले त्यामुळे ही योजना मंजूर झाल्याचा दावा त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025 : शेवटच्या चंद्रग्रहणाच्या सुतक काळाची वेळ काय?

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

SCROLL FOR NEXT