CM Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिवसेना बाजी मारणार का? CM शिंदे करणार प्रचार, सूत्रांची माहिती

Rajasthan Assembly Election: मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळतेय.
CM eknath shinde
CM eknath shinde Saam TV
Published On

Eknath Shinde News:

राजस्थानमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाणार असल्याची महिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून राजस्थानमध्ये माजी मंत्री राजेंद्र गुढा हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गुढा यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानला जाणार असल्याची माहिती मिळलीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM eknath shinde
Solapur Crime News: रीलस्टार अभिनेत्रीशी असभ्य वर्तन; माजी नगरसेवक पुत्राला पोलिसांकडून समज

राजस्थानमध्ये (Rajsthan) बहुतांश मराठी बांधव हे व्यवसायासाठी स्थायिक झाले आहेत. यासह मुंबईत व्यवसायासाठी स्थायिक झालेले व्यापारी मतदानासाठी राजस्थानला जातात. या मतांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री राजस्थानमध्ये प्रचारासाठी जाणार असल्याची माहिती मिळतेय.

महाराष्ट्रात घडलेल्या राजकिय सत्तांतरानंतर मुख्यमंत्री यापूर्वी कर्नाटक निवडणुकांवेळीही प्रचाराला गेले होते. त्यानंतर राजस्थानला जात असल्याने शिवसेना आता महाराष्ट्राबाहेरही विस्तार करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न सुरू अससल्याचं दिसत आहे. राजस्थानमध्ये येत्या 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.

राजेंद्र गुढा यांचा राजकीय प्रवास

साल २००८ पासून राजेंद्र गुढा राजस्थानच्या राजकारणात सक्रीय आहेत. ते गेहलोत सरकार मधील मंत्री आहेत. सुरूवातीला काँग्रेस आणि मग बहुजन समाज पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली आहे.गेल्या निवडणुकीत राजेंद्र गुढा बसपाकडून निवडून आले होते. नंतर पुढे त्यांनी काँग्रेस सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. पुढे सप्टेंबरमध्ये त्यांनी एकनाथ शिेदेंच्या (Eknath Shinde) शिवसेनेत प्रवेश केला.

CM eknath shinde
Solapur Crime News: MIDC परिसरातून ड्रग्सची तस्करी, तो पैसे पुरवायचा, पोलिसांनी अशी केली अटक?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com