Weather Update: थंडीच्या कडाक्यानंतर अंगाची होणार लाही लाही? राज्यातील काही भागात पावसाची शक्यता: हवामान खात्याचा अंदाज

Weather Update: कोरड्या हवामानामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही दिवस किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उद्यापासून महाराष्ट्रात आग्नेय दिशेकडून येणाऱ्या दमट हवेचा वेग वाढल्याने दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल.
Weather Update
Weather UpdateSaam Tv
Published On

Maharashtra Weather Update :

वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे तमिळनाडूच्या किनारपट्टीवर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झालीय. त्याचबरोबर बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार झाल्याने हवामानात बदल झालाय. हवामानातील बदलामुळे २३ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान कोकण किनारपट्टीवर आणि गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने पुण्यातील तापमानात चढ-उतार होत आहे. सकाळी धुके आणि दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. (Latest News)

पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यामुळे कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. २३ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत या भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तर २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यात वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता IMDच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी वर्तवलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोरड्या हवामानामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये काही दिवस किमान तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. उद्यापासून महाराष्ट्रात आग्नेय दिशेकडून येणाऱ्या दमट हवेचा वेग वाढल्याने दक्षिण महाराष्ट्रात कमाल तापमानात वाढ होईल. वातावरणातील या बदलामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सकाळी गुलाबी थंडी तर काही ठिकाणी दाट धुके पडणार आहे.

दरम्यान राज्यात पावसाचा इशारा असल्याने गुरुवारपासून कोकणातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यातही त्याचा परिणाम हवामानावर झाल्याचे पाहायला मिळेल. तर तमिळनाडूच्या आणि केरळमध्ये समुद्र सपाटीपासून ३.१ चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची तसेच त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील ४८ तासांत राज्यासह देशातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार-पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होईल.

Weather Update
Maharashtra Weather Update: राज्यात तापमानाचा चढ उताराचा खेळ सुरु; काही जिल्ह्यात पावसाची शक्यता, हवामान कसं असेल?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com