
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दुसरीकडे पाच राज्य आपल्या हातातून जातील अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी होतील, असं भाकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पुथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
समता, मानवता तोडण्याचा काही मूठभर लोकांचा डाव आहे. त्यांचा मोदींचा हा चेहरा पुढे असला तरी, त्यांचा बोलवता धनी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, असा घणाघात पुथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसवर केला आहे.
काय म्हणाले पुथ्वीराज चव्हाण?
पुथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कदाचित नरेंद्र मोदी उद्या लोकसभेचं विसर्जन करतील. विरोधी पक्ष नेत्यांना बेसावध ठेवून लोकसभा निवडणूक जाहीर करतील. नरेंद्र मोदी यांची पावले देशाला हुकूमशाहीच्या दिशेने घेऊन जाणारी आणि देशातील लोकशाही संपवणारी आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
ते म्हणाले, देशाचा संविधान मोडायचा प्रयत्न आरएसएस आणि पंतप्रधान मोदी करत आहेत. मोदींचा हा चेहरा पुढे असला तरी, त्यांचा बोलवता धनी हा आरएसएस आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे कुठल्याही ठरला जाऊन काहीही करू शकतात. (Latest Marathi News)
याआधीही एका सभेला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते की, ‘देशाची स्थिती आराजकतेकडे निघाली आहे. कर्जाचा बोजा वाढत आहे. देशामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ मुद्दाम वाढवली जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा सत्तेत आला तर पुढील विधानसभा निवडणुकही होणार नाही.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.