Ayodhya Ram Mandir Threat Call: अयोध्येतील राम मंदिर बाॅम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

Ayodhya Ram Mandir Threat Call: अयोध्यामध्ये होत असलेल्या राम मंदिराला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandir Saam Tv
Published On

Aodhya Ram Temple Threath call:

अयोध्यामध्ये होत असलेल्या राम मंदिराला बाॅम्बने उडवून देण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. (Latest Marathi News)

'आज तक'ने दिलेल्या माहितीनुसार, अयोध्यामध्ये होत असलेल्या राम मंदिराला धमकी दिल्यानंतर उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी धमकी देणाऱ्या १४ वर्षीय मुलाला बरेली येथून ताब्यात घेतलं आहे. हा मुलगा इयत्ता आठवीत आहे.

१४ वर्षीय मुलाने ११२ या पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून अयोध्या राम मंदिराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. चौकशी दरम्यान या मुलाने युट्यूबवर राम मंदिर होत असल्याचं पाहिलं, त्यानंतर त्याने ही धमकी दिल्याचे सांगितले.

Ayodhya Ram Mandir
India Canada Tension: कॅनडातील भारतीयांनी 'या' भागात जाणं टाळा, केंद्र सरकारने जाहीर केली अ‍ॅडव्हायझरी...

दरम्यान, पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आल्यानंतर पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. या धमकीच्या कॉलनंतर पोलिसांची झोप उडाली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल आल्यानंतर गुप्तहेर खातं आणि सायबर खात्याने तपास सुरू केला.

पोलिसांनी तपास करत एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी या मुलाची चौकशी केली. या मुलाने चौकशीत सांगितलं की, युट्युबवर राम मंदिर तयार होत असल्याचं पाहिलं. त्यानंतर त्याने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला कॉल करून राम मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली.

दरम्यान, पोलीस या मुलाची आणखी चौकशी करत आहेत. या मुलाने धमकी दिल्यानंतर घाबरून मोबाईल बंद केला होता. त्यानंतरही पोलिसांनी मोठ्या शिताफीने या मुलाचा शोध घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com