Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील ठाकरे गट-काँग्रेसचे सूर जुळले, महत्वाच्या मुद्द्यावर एकमत

Mahavikas Aghadi News : जागावाटपाच्या मुद्द्यावर वाद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसनं या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
Uddhav Thackeray Sharad pawar nana patole
Uddhav Thackeray Sharad pawar nana patoleSAAM TV
Published On

Maharashtra Political News : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या आधीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत. दुसरीकडे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय. महाविकास आघाडीत जागावाटपाच्या मुद्द्यावर वाद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, काँग्रेसनं या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपावरून कोणतीही स्पर्धा नाही किंवा वाद नाहीत. मेरिटनुसार जागावाटप होईल असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं होतं. तीच भूमिका काँग्रेसची आहे असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं (Political News)

देशातील मोदी सरकारनं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केली होती; मात्र, ते न डगमगता सामोरे गेले. ‘डरो मत’ असा संदेश त्यांनी दिला. त्यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात करावा ही काँग्रेस पक्षाची भावना होती. त्यामुळेच मुंबईत १ सप्टेंबरला काँग्रेसतर्फे राहुल यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे पटोले यांनी सांगितले.

मुंबईतील दादर येथील टिळक भवनमध्ये राहुल यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा पटोले यांनी घेतला. त्यावेळी नाना पटोले बोलत होते. 'राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप केले. त्यांची खासदारकी रद्द केली गेली. त्यांना सरकारी निवासस्थानही रिकामे करण्यास भाग पाडले. एवढं होऊनही ते मागे हटले नाहीत. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करावी लागली,' असं नाना पटोले म्हणाले.

केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावावरील चर्चेत राहुल गांधी यांनी भाग घेतला. त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. मणिपूरच्या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं, असं पटोले म्हणाले. राहुल यांचा सत्कार १ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

Uddhav Thackeray Sharad pawar nana patole
Sharad Pawar On Chhagan Bhujabal: '...तर भुजबळ तुरुंगात गेले असते', शरद पवारांचं तेलगी प्रकरणावर मोठं विधान

महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपावरून कुठलीही स्पर्धा किंवा वाद नाहीत. उद्धव ठाकरेंनीही मेरिटप्रमाणे जागावाटप होईल अशी भूमिका घेतली होती, काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. मोदी सरकारचा पराभव करणं हाच मविआचा उद्देश आहे, अशी आक्रमक भूमिका पटोलेंनी मांडली.

पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी भाष्य केलं. इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपकडून होत असलेली टीका हास्यास्पद आहे. देशभरातील २८ पक्ष मोदी सरकारविरोधात एकत्र आले आहेत. इंडिया आघाडीची ताकद पाहून भाजप घाबरला आहे, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला. विरोधी पक्षांची इंडिया आघाडी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळं मतविभाजनासाठी 'बीआरएस'सारख्या पक्षांना पुढं केलं जातंय, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

Uddhav Thackeray Sharad pawar nana patole
Eknath Shinde News In Marathi: मुंबईचा आर्थिक कायापालट करणार; CM एकनाथ शिंदेंनी सांगितला मास्टर प्लान

राज्य सरकारमध्ये अंतर्गत विरोध : चव्हाण

राज्यातील शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये अंतर्गत विरोध आहे. सरकारला एका वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला तरी, अद्याप पालकमंत्र्यांची नेमणूक करता आली नाही. मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. निधी वाटपावरूनही सत्ताधारी पक्षांत वाद सुरू आहेत. या अंतर्गत वादाचा फटका शेतकरी, तरूण, कामगार आणि राज्यामध्ये येणाऱ्या गुंतवणुकीवर होत असल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com