Kolhapur Breaking News Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur News : मोठी बातमी! कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटला; ८ जण वाहून गेले, तिघांना वाचवण्यात यश

Satish Daud

रणजित माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झालंय. अशातच शिरोळ तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. बस्तवड-अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना घडलीय. ट्रॅक्टरमधील ८ जण वाहून गेले आहेत. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलंय.

या थरारक घटनेचा व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातोय. घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने पंचगंगा नदीला महापूर आलाय. नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. शिरोळ तालुक्यातील बस्तवड गावालाही चौहेबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. त्यामुळे गावातील जनजीवन विस्कळीत झालंय.

अशातच गावाला होणारा पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील काही नागरिक ट्रॅक्टरमधून विद्युत पंप सुरू करण्यासाठी जात होते. या ट्रॅक्टरमधून 8 जण प्रवास करीत होते. त्याचवेळी बस्तवड - अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात अचानक ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले.

यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलंय. नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अजूनही ५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जातोय. सध्या बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफचे पथक रवाना झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Court Job: उच्च न्यायालयात नोकरीची संधी; विविध पदांसाठी भरती सुरु; अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Anant Chaturdasi 2024 : विसर्जन करण्याआधी बाप्पाला दाखवा मखाना खिरीचा नैवेद्य; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Updates : मनोज जरांगे पाटील यांचं मध्यरात्रीपासून आमरण उपोषण सुरू

Team India Playing XI: या 3 खेळाडूंना संधी मिळणं कठीण! पहिल्या सामन्यासाठी अशी असेल प्लेइंग 11

Ganesh Visarjan 2024: गणपती विसर्जनावेळी बाप्पाची मूर्ती घराबाहेर आणताना 'ही' मोठी चूक करू नका, पाहा कोणत्या गोष्टींची घ्याल काळजी?

SCROLL FOR NEXT