Kolhapur Accident News:  Saamtv
महाराष्ट्र

Kolhapur Accident: हृदयद्रावक! बोलेरो- ट्रकचा भीषण अपघात! एकाच गावातील ३ तरुण ठार; ४ जण जखमी

Kolhapur Accident News: या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील सोळंकुर गावचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

रणजित माजगावकर, कोल्हापूर|ता. ११ सप्टेंबर २०२४

Kolhapur Bolero Truck Accident: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातांचे सत्र सुरु असून कोल्हापूरमधून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. देवगड - निपाणी राज्य मार्गावर ट्रक आणि बोलेरा गाडीचा भयंकर अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. अपघातातील मृत हे कोल्हापूर जिल्ह्यातील सोळंकुर गावचे असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवगड- निपाणी राज्य महामार्गावरुन एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. देवगड - निपाणी राज्य मार्गावरील मांगेवाडी गावाजवळ मध्यरात्री बोलेरो आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातामध्ये तीन तरुणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघातातील मृत तरुण हे कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकुर गावाचे असून ते सरावडे गावाहून सोळंकुरकडे निघाले होते. यावेळी राधानगरी तालुक्यातील मांगेवाडी गावाजवळ त्यांच्या बोलेरो गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बोलेरा कारचा अक्षरशः चक्काचूर झाला तर या दुर्दैवी घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झालेत.

रोहन संभाजी लोहार (वय 23), आकाश आनंदा परीट (वय२४), शुभम चंद्रकांत घावरे (वय२३) अशी मृत तरुणांची नाव आहेत. तर ऋत्विक राजेंद्र पाटील, सौरभ सुरेश तेल भरत धनाजी पाटील, संभाजी हणमंत लोहार अशी जखमी तरुणांची नावे आहेत. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, मृत पावलेले सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील सोळांकुर गावाचे असून ऐन गणेशोत्सवात घडलेल्या या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रेड लाईट एरियात बांगलादेशी महिलांचा सुळसुळाट; अनधिकृत प्रवेश करत वेश्या व्यवसाय

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

SCROLL FOR NEXT