Kolhapur News: लेझरमुळे तरूणाच्या डोळ्याचा घात, लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्त्राव; जीवनात अंधार आणणारा उन्माद कधी थांबणार?

laser Light : कोल्हापुरात लेझरमुळे एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून लेझर लाईटमुळे त्याच्या डोळ्यात रक्तस्त्राव झाला आहे.
लेझरमुळे तरूणाच्या डोळ्याचा घात, लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्त्राव; जीवनात अंधार आणणारा उन्माद कधी थांबणार?
Kolhapur NewsSaam Tv
Published On

संपूर्ण राज्यभरात गणपती बाप्पाचं वाजत-गाजत मिरवणूक काढत आगमन झालंय. कुठे लेझीम-ढोल-ताशांचा गजर असा मराठमोळा थाट होता. तर कुठे विद्युत रोषणाई, डीजे, लेझरचा मारा होता. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील उचगावमध्ये याच लेझरमुळे तरुणाच्या डोळ्यावर विघ्न आलंय.

21 वर्षीय आदित्य बोडके हा देखील मिरवणूक पाहण्यासाठी गेला होता. या मिरवणुकीत प्रखर लेझर किरणांचा वापरण्यात आला होता. मात्र ही किरणं डोळ्यावर पडल्यानं या तरुणाचा डोळा लाल होऊन पाणी वाहू लागलं. त्याला शास्त्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या बुबुळाला या किरणांमुळे इजा झाली होती. डोळ्यामध्ये रक्तस्त्राव झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले.

लेझरमुळे तरूणाच्या डोळ्याचा घात, लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्त्राव; जीवनात अंधार आणणारा उन्माद कधी थांबणार?
Maharashtra Politics: विधानसभेतही सांगली पॅटर्न? रोहित पाटील यांच्याविरोधात विशाल पाटलांची बंडाळी?

या लेझरचा उचगाव परिसरात अनेकांना त्रास झाल्याची चर्चा आहे. टेंबलाईवाडीत बंदोबस्ताला असणारे हवालदार युवराज पाटील यांच्याही डोळ्याला लेझरमुळे त्रास झाला. त्यांचा उजवा डोळा लाल होऊन सूज आल्याने त्यांनीही उपचार घेतल्याची माहिती आहे. लेझरमुळे डोळ्यांवर काय परीणाम होतो हे जाणून घेऊ..

मिळालेल्या माहितीनुसार, लेझरच्या तीव्र प्रकाशमुळे छोट्या रक्तवाहिन्या फुटतात. रेटिनाच्या आजूबाजूला असणाऱ्या छोट्या रक्तवाहिन्या फुटतात. तीव्र स्वरूपाचे लेझर लाइट टार्गेटेड असतात. रेटिनाच्या मध्यावर हा लाइट पडल्यास डोळा भाजतो. नजर अंधूक होते किंवा कायमची दृष्टी जाते. याचबद्दल बोलताना ज्येष्ठ नेत्ररोग तज्ञ डॉ. तात्याराव लहाने म्हणाले आहेत की, लेझरचा झोत थेट डोळ्यावर आल्यास गंभीर परीणाम होऊ शकतात.

लेझरमुळे तरूणाच्या डोळ्याचा घात, लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्त्राव; जीवनात अंधार आणणारा उन्माद कधी थांबणार?
Maharashtra Politics: विधानसभेतही सांगली पॅटर्न? रोहित पाटील यांच्याविरोधात विशाल पाटलांची बंडाळी?

दोन वर्षांपूर्वीच्या एका अभ्यासात गणेशोत्सव काळात कोल्हापूर जिल्ह्यात 'लेझर शो'मुळं 70 जणांच्या डोळ्यांना इजा झाल्याची नोंद होती. गेल्या वर्षीही असे प्रकार समोर आले होते. त्यामुळे लेझर आणि कर्णकर्कश अशा डीजेचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाईची गरज आहे. केवळ कागदावरची कारवाई नको. कुठल्याही मिरवणुकीत जीवनात अंधार आणि बहिरेपणा आणणारे हे घातक प्रकार थांबवणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com