Khushboo Baraiya, Gondia, MPSC Exam Result saam tv
महाराष्ट्र

PSI Success Story : वडिलांचे कष्ट पाहून 'खुशबू' झाली व्यथित... मार्ग दिसला अन् 'बरैय्या' बनली फाैजदार (पाहा व्हिडिओ)

Khushboo Baraiya PSI Gondia : जिद्दीच्या जाेरावर मुलीने साकारलं कुटुंबाचे स्वप्न.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Gondia News : जीवनात कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरैय्या (Khushboo Prahlad Baraiya) या 25 वर्षीय युवतीने स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही शिकविणी वर्ग न लावता गावामध्ये राहून नियमित अवांतर अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिच्या अथक परिश्रमाला यश येऊन चप्पल-जोडे शिवणाऱ्याची मुलगी खुशबू आता पोलिस उपनिरीक्षक होणार आहे. (Maharashtra News)

पहिल्याच प्रयत्नांत खुशबूने मिळविले यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदाची (mpsc 2020 final result) यादी जाहीर करण्यात आली. त्यात गोंदिया (gondia) जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव (arjuni morgaon) येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या (Khushboo Baraiya) या 25 वर्षीय युवतीने 364 गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले. खुबशूच्या या असामान्य यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.

मुलांच्या शिक्षणासाठी वडिलांनी साेसले कष्ट

खुशबूचे वडील प्रल्हाद बरैय्या यांचे अर्जुनी शहराच्या ठिकाणी लहानसे दुकान आहे. ते चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. दोन खोल्यांच्या घरात पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा याच व्यवसायावर ते चालवितात. प्रल्हाद यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची पत्नी सहा वर्षांपासून आजारी आहे.

मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शिक्षणापासून प्रगती नाही याची जाण त्यांना वेळोवेळी होत असल्याने त्यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही उणीव भासू दिली नाही. आपली मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती. खुशबूने त्यांचे स्वप्न पूर्ण केले.

मुलीने आमचं स्वप्न पूर्ण केले

या यशाबद्दल प्रल्हाद म्हणाले घरामध्ये अभ्यासासाठी सोय नसताना सुद्धा 'खुशबू'ने स्वत: कष्ट करून त्रास सहन करुन स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता एमपीएससीची परीक्षा दिली. तिने यासाठी शहरातच गेले पाहिजे असा हट्ट धरला नाही. अभ्यास वर्गाचा आग्रह केला नाही.

तिच्या अभ्यासाठी अर्जुनी मोरगाव पोलिस स्टेशनच्या वाचनालयाचा फायदा झाला. खुशबूने तिचे भविष्य घडविले. ती नियमित सकाळी आठ वाजता खुशबू वाचनालयात जायची. भाऊ अनमोल तिला जेवणाचा डबा नेऊन द्यायचा. एकदा सकाळी वाचनालयात गेल्यावर ती संध्याकाळी घरी यायची असेही प्रल्हाद यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT